पान:विधवाविवाह.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्तिकाळाखेरीज इतरकाळी शूद्राच्या घरी शिजवून खाणे हे दोषावह आहे. दासनापितगोपाल कुलमित्रार्द्ध सीरिणः । एते शूद्रेषु भोज्यान्ना यश्चात्मानं निवेदयेत् ।। "शूद्र जातीपैकी दास, नापित, गोपाल, कुलमित्र आणि अर्धसीरी या पोटजाती व आपणाकडे साह्यासाठी येणारे पुरुष यांचे अन्न (ह्मणजे यांनी दिलेले तांदूळ वगैरे धान्य) यांच्याच घरी शिजवून खाण्यास चिंता नाही." या वरील तीन वचनांवरून असे स्पष्ट दिसते की, शूद्राने दाणे, तांदूळ इत्यादि कोरडे धान्य दिले असता ते देखील ब्राह्मण जर त्या शूद्राच्या घरी शिजवून अथवा करून खाईल तर त्याने ते शूद्राचे अन्न खाले से होते; शूद्राने दिलेले तेच धान्य ब्राह्मण आपल्या घरी आणून शिजवून खाईल तर ते शूद्रान्न होत नाही. तथापि आपस्काळी तेच धान्य शूद्राने दिले असून त्याच्या घरी शिजवून खालें असतां चालते. परंतु दास, नापित, गोपाल इत्यादिकांनी दिलेले धान्य आपत्काली किंवा अन्यकाळी त्यांच्या घरीं शिजवून खाण्यास प्रत्यवाय नाही. तर हे असले शूद्राचे अन्न घेण्यास काय चिंता आहे याचा विचार आमच्या वाचणाऱ्यांनी करावा. शूद्रान (शूद्राचे अन्न ) या शब्दाचा अर्थ शूद्राने शिजवलेले अन्न असा कोणी समजले आहेत. पण या ठिकाणी या शब्दाचा अर्थ असा होतच नाही. असा अर्थ असता तर आ