पान:विधवाविवाह.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन वचनांचा उद्देश कोणता आहे या गोष्टीचा चांगला विचार केला असतां आमचे प्रातिपक्षीही हे उत्तर मान्य करतील यांत संशयच नाही. ते असें: शुष्कान्नं गोरसं स्नेहं शूद्रवेश्मन आगतम् । पक्कं विप्रगृहे पूतं भोज्यं तन्मनुरब्रवीत् । "कोरडे ( न शिजवलेले ) अन्न गोरस ( दूधवगरे) आणि तेल, हे पदार्थ शूद्राच्या घरून आले असल्यास ब्रा. ह्मणाच्या घरी शिजवले असतां ते शुद्ध हातात, आणि ते भक्षण्याविषयों मनूने मोकळीक दिली आहे." या वचनाचा अर्थ असा आहे की, शूद्राने ब्राह्मणास तांदूळवगेरे दिले असतां ब्राह्मणाने ते घेऊन आपल्या घरी आणून शिजवून खुशाल खावे. त्यास तत्प्रयुक्त दोष अगदी लागणार नाही. यावरून असे अनुमान होते की. शद्राच्या घरी शिजवून मग खालें असतां त्यास दोष लागेल. आपत्काले तु विप्रेण भुक्तं शूद्रगहे यदि । मनस्तापेन शुध्येत दुपदां वा शतं जपेत् ॥ "आपत्काली ब्राह्मणाने शूद्राच्या घरी भोजन केले अ. मतां तो पश्चात्तापाने अथवा द्रुपद मंत्राचा शंभर जप के ल्याने शुद्ध होतो." या वचनावरून असे स्पष्ट दिसते की, आपत्तिकाळी शद्राच्या घरी अन्न शिजवून खाल्लें असतां ब्राह्मणास मोठासा दोष लागत नाही. यास्तव असे अनुमान होते की, आप