पान:विधवाविवाह.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतकेच की, तो संक्षेप करण्याचा विधि पराशराने जे निरंतर अग्निहोत्री व वेदाध्यायी आहेत त्यांसच उद्देशून सांगितला आहे. तो असाः एकाहात् शध्यते विप्रो योऽग्निवेदसमन्वितः । पहात् केवलवेदस्तु द्विहीनो दशभिईिनैः ॥ " प्रत्यहीं होमहवन व वेदाध्ययन ही दोन्ही करणारा ब्राह्मण अशौचापासून एका दिवसाने मुक्त होतो. केवळ वेदाध्ययन करणारा ब्राह्मण तीन दिवसांनी मुक्त होतो. होमहवन न करणारा व वेदाध्ययनही न करणारा ब्राह्मण दहा दिवसांनी मुक्त होतो." आलीकडे रोजचे होमहवन व वेदाध्ययन ही प्रचारांतून अगदी बुडत चालली त्यामुळेच अशौचकाळाचा संक्षेप करण्याचाही संप्रदाय मागे पडला. शूद्रजातीपैकी दास नापित, गोपाल इत्यादिकांनी दिलेल्या अन्नाचे भक्षण करणे हैं पराशरसंहितेत कलिधर्मामध्ये सांगितले आहे त्यापक्षों तो कलिधर्म आहेच यांत अगदी संशय नाही. दासादिकांनी दिलेले भक्ष्य पराशरसंहितेत सांगितल्याप्रमाणे कलियुगांत खाण्यास मोकळीक आहे असे ह्मणतां तर वरिष्ठ जातीतले लोक ( ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ) यांस त्यांचे अन्न खाण्यास मोकळीक आहे काय ? असा प्रश्न कोणी करील. या प्रश्नास माझें उ र असे आहे की, त्यांस मोकळी आहे. च व ते सामान्यतः खातही असतात. पराशराने ज्या वचनांत ही मोकळीक दिली आहे त्याचा व त्याच्यापूर्वीच्या