पान:विधवाविवाह.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युगांत औरस, दत्तक व कृत्रिम हे तीन प्रकारचे पुत्र कायदेशीर आहेत." ह्मणजे आदित्यपुराणस्थ निषेधानुरोधेकरून कलियुगांत औरस व दत्तक हे दोनच प्रकारचे पुत्र ग्राह्य आहेत तरी पराशराने कलिधर्मांत कृत्रिम पुत्राचे ग्रहण करण्याविषयों आज्ञा दिली आहे त्यावरून तोही सशास्त्र आहे; आदित्यपुराणांत दूरच्या यात्रेचा निषेध आहे. परंतु बहुत लोक हल्ली दूरच्या यात्रा करतात हे सर्वांस माहीत आहे. ब्राह्मणास मरणांत प्रायश्चित्ताचा निषेध आहे त्याचे कधीच कोणी पालन केले नाही. वादाववादांत बौद्ध लोकांच्या मताचे खंडन करून वौदिक धर्माची स्थापना करणारा जो महाप्रख्यात उदयनाचार्य त्याने अग्निप्रवेश केला. अगदी आलीकडे एक प्रसिद्ध पुरुष, कैलासवासी शाम च. रण बनर्जिया याने, सर्व पापाच्या प्रायश्चिताकरितां, काशीस्थ पंडितांच्या अनुमताने, देहांतप्रायश्चिताच्या संकल्पाने आमरणांत आहार वर्ज केला होता. कलियुगांत अश्वमेध याग करण्याविषयों पराशराने आज्ञा दिली आहे आणि कलियुगांतच निरनिराळ्या काळच्या राजांनी तो केल्याविषयींची प्रमाणे आहेत, त्याअर्थी अश्वमेध याग इतर युगांतल्याप्रमाणे कलियुगांतही करावा असे होते. अशौच कालाचा संक्षेप करणे हे पराशर संहितेमध्ये कलिधर्मात सांगितले आहे तेव्हां तो कलिधर्म आहे याविषयों संशयाचा लेशही नाही. अर्वाचीनकाळचे ब्राह्मण अशौच काळाचा संक्षेप करतांना आढळत नाहीत, याचे कारण