पान:विधवाविवाह.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्षे राज्यकरून अनेक रोगांनी पीडा दिल्यामुळे अभिप्रवेश केला." मिहिराकुल राजाने सिंहलद्वीपास सैन्य नेऊन तेथील राजास पदभ्रष्ट केले. यावरून त्याच्यावेळी समुद्रपर्यटन निषिद्ध नव्हते. ते असे:-- स जातु देवी संवीतसिंहलांशुककंचकाम् ।। हेमपादांकितकुची दृष्टा जज्वाल मन्युना ॥२९६ सिंहलेषु नरेद्रांनिमुद्रांकः क्रियते पटः । इति केंचुकिना पुष्टेनोक्तो यात्रां व्यधात्ततः॥२९७ तत्सेनाकंभिदानांभो निम्नगाकृतसंगमः ॥ यमुनालिंगनप्रोति प्रदेदक्षिणाणवः ॥ २९८ स सिंहलेन्द्रेण सम संरम्भादुदपाटयत् ।। चिरेण चरणस्पृष्टप्रियालोकनजां रुषम् ॥ २९९* "सिंहलद्वीपांत विणलेल्या कापडाची चोळी राणीने अंगांत घातली होती. त्या कापडावर पायाच्या आकृतीचे सोन्याचे बुट्टे होते त्यांपैकी काहींबढे राणीच्या स्तनांवर आले होते. ते पाहून राजास मोठा संताप आला. आणि अंतःपरांतील सेवकास विचारता त्याने सांगितले, की, सिंहलद्वीपांत राजाच्या पायाच्या आकृतीच्या बट्टीचे कापड विणतात. हे ऐकन राजाने सिंहलद्वीपावर स्वारी केली. यावेळी त्याच्या सेनेतील हत्तींच्या तोंडातून बाहेर पडलेल्या पाण्याचा ओघ दक्षिण समुद्रास मिळाला. तेणेकरून त्या समुद्रास यमुनानदीचें आलिंगन केल्याप्रमाणे आनंद झाला. मिहिराकुल राजाने सिंहलद्वीपच्या राजाबरोबर युद्ध केले,

  • कव्हन याची राजतरंगिणी, तरंग १.