पान:विधवाविवाह.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रवरसेन राजाने चारवेळ अश्वमेध केले असल्याविषयी चांगले प्रमाण आहे. त्या राजाने देवशर्माचार्य नावाच्या ब्राह्मणास इनाम जमीन दिली, तिच्या सनदेंत असे स्पष्ट लिहिले आहे की, चतरश्वमेधयाजिनः विष्णुरुद्रसगोत्रस्य सम्राजः काटकानां महाराजश्रीप्रवरसेनस्य इत्यादि । * "विष्णुरुद्र राजाचा वंशज, चार अश्वमेध यज्ञ करणारा, काटकांचा राजा जो प्रवरसेन इ०" याच सनदेमध्ये प्रवरसेनाच्या पूर्वजांनी दहावेळ अश्वमेध केले असल्याविषयों असे लिहिले आहे की, दशाश्वमेधावभृथस्नातानाम् । * " दहावेळ अश्वमेध केलेले" काश्मीर देशचा राजा मिहिराकुल याने अग्निप्रवेश केल्याविषयों असे लिहिले आहे की, स वर्षसप्ततिं भुक्त्वा भुवं भूलोकभैरवः । भरिरोगाहितवपुः प्राविशज्जातवेदसम् ॥+ " मोठ्या भयंकर स्वभावाच्या मिहिराकुल राजाने ७० मला उत्पन्न होईल. तो सर्व वारांमध्ये अग्रणी व सिद्धांमध्ये प्रमुख होई - सर्व पापरूपी बलिष्ठ राजांचा वध करील. चर्विना ये आराध. ना केल्यानंतर त्याला योगसिद्धि होईल. त्यानंतर २० वर्षांनी ( काले. युग लागल्यानंतर 33१० वर्षानों) नंदकुलातील राजे बलिउ होनील त्यांचा वध चाणक्य या नावाचा ( राजा) करील आण शुक्रतीयों ईश्वराराधनाकरून तो पापनिर्मुक्त होईल, त्यानंतर ६९० विक्रमादित्य राजा होईल."

  • सन १८च्या नोवेंबर महिन्याच्या एशियाटिक सोसीचे जर्नल या नावाच्या पुस्तकाचे ७२८वें पृष्ठ पाहा. + कल्हण याची राजतरंगिणी, तरंग..