पान:विधवाविवाह.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असवां त्या धर्माचे आचरण केले, यास्तव तो निषेध कलियुगांत मानतात, असे प्रतिपादन कसे करता येईल ? विवाहित स्त्रीचा पुनर्विवाह; ज्येष्ठबंधूस उत्तम भाग : समुद्रपर्यटन ; संन्यासग्रहण ; द्विजांचा निरनिराळ्या जाती. च्या कंन्यांशी विवाह; दिरापासून पुत्रोत्यत्ति ; मधुपर्काम. ध्ये पशूचावध : श्राद्धामध्ये मांसभक्षण , वानप्रस्थाश्रमधारण ; एकास दिलेल्या कन्येचे पुनः दान ; बहुत वर्षे. पर्यंत ब्रह्मचर्य ; नरमेध, अश्वमेध अथवा गोमेध ; आमरणांत यात्रा ; अग्नीमध्ये प्रवेश ; ब्राह्मणाला देहांत प्रायश्चित्त दत्तक व औरस यांखेरीज इतर प्रकारच्या पुत्रांचा पुत्रत्वेकरून स्वीकार, वेदांतील विद्वत्ता व आंगचे पावित्र्य यांच्या मानाने अशौचकालाची न्यूनता ; शूद्रजातीच्या दास, नापित आणि गोपाल वगैरेंनी दिलेल्या अन्नाचे भक्षण ; हे व दुसरे काही धर्म आदि, बृहन्नारदीय व आदित्य या पुराणां. मध्ये कलिवांत सांगितले आहेत. यांपैकी अश्वमेध अ. नीमध्ये प्रवेश, सन्यास, बहुतवर्षेपर्यंत ब्रह्मचर्य, समुद्रपर्यटन, दरची तीर्थयात्रा आणि विधवांचा पुनर्विवाह, हे धर्म कालयगामध्ये घडत असल्याविषयी स्पष्ट प्रमाण आहे. तें याप्रमाणे:- कलियुग लागल्यानंतर ६५३ वर्षांनी पांडव उत्पलझाले त्यांनी अश्वमेध व दरदेशची यात्रा ही केली. या गोष्टी सर्व लोकांस इतक्या माहीत आहेत की, त्यांजविषयी प्रमाण सांगण्याचे जरूरच नाही. यांखेरीज नागराज ऐरावत याच्या विधवाकन्येशी अर्जुनाने विवाह केल्याचे मागे ( ७७ व्या पृष्ठावर ) सांगितले आहे. विक्रमादित्याच्यापूर्वी पांचसातशे वर्षांच्या सुमारास