पान:विधवाविवाह.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देखील स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा सर्वया प्रतिबंध करावा, असा त्याचा अर्थ होणारच नाही. कारण, त्याचा निषेध अगदी सामान्य आहे ह्याणि पराशराने पांच आ पत्तींच्या प्रसंगी पुनर्विवाहाचे विशेष विधान केले आहे. आणि विशेष नियमाने सामान्य नियमाचा बाध झालाच पाहिजे. अध्याय ६. (मूलग्रंथाचा अध्याय १०) पराशरसंहितेत अन्य युगांतील धर्माचे प्रतिपादन नसन फक्त कलियुगांतोल धर्माचेच प्रतिपादन आहे. कोणावें हणणे असे आहे की, पराशरसंहितेत सांगितलेले धर्म केवळ कलियुगांतलेच आहेत असे नाही. तर दुसऱ्या युगांतीलही आहेत. या ह्मणण्यांतला हेतु असा दिसतो की, पराशरसंहितेत कलियुगांतल्या धर्माखेरीज इतरयुगांवले धर्म सांगितले आहेत, असे सिद्ध झाले तर, विधवा व दुसऱ्या विवाहित त्रिया यांच्या पुनर्विवाहाविषयों पराशराने लिहिलेला नियम कलियुगास लागू न करिता अन्ययुगास लागू करितां येईल. आणि विधवा विवाह कलियुगांत शास्त्रसंमत होणार नाही. पराशरसंहितेत अश्वमेध करणे, शुद्र जातीतील दास, नापित, आणि गोपाल वगैरे यांचे अन्न खाणे, ब्रह्मचाऱ्यास अशौचाचा काळ कमी करमें इत्यादि विधि सांगितले आहेत हे सत्य, त्रेता आणि द्वापार याच युगांतील धर्म आहेत, कलियुगांतील नव्हेत, अशा समजुतीने प्रतिपक्षी यांनी ही हरकत काढली आहे;