पान:विधवाविवाह.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भारतांत आणखी असे आढळते की, नागराज ऐरावत या. च्या विधवा कन्येशी अर्जुनाने विवाह केला. विधवाविवाहा विषयों दीर्घतमा याचा निषेध असता तर तो निषेध झाल्या दिवसा नंतर ऐरावत नागराज याने आपल्या विधवा कन्येचा अर्जुनाशी विवाह करण्याचा विचार काढला नसता. सारांश, अन्य पुरुषापासून क्षेत्रन पुत्राची उत्पत्ति करणे, व पतीच्या मरणानंतर पुनर्विवाह करणे, · या गोष्टी शास्त्रसंमत आहेत; आणि बहुत दिवसांपासून चा. लत आलेला शास्त्रविरुद्ध जो व्यभिचार त्याचा निषेध दीर्घतमा याने केला आहे. त्या निषेधाचा या दोन्ही गोष्टी शी काही संबंध नाही. मागे लिहिल्याप्रमाणे दीर्घतमा याचा निषेध बहुत दिवसांपासून चालत आलेल्या व्यभिचारा विषयींच आहे हे उघड आहे. आतां वरील वचनाचा दुसऱ्या रीतीने विचार करूं. ते पुनर्विवाहाचे निषेधक आहे असे घेतले तरी, दीर्घतमा याचा निषेध सांप्रत काळी विधवाविवाहास प्रतिबंधक होईल, या ह्मणण्यास ते मुळीच वळकटी आणणार नाही; कारण, त्या वचनांत विशेष युगाचा उल्लेख नसल्यावरून ते सर्व युगांस साधारण लागू असून सामान्य आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे पराशराचे वचन केवळ कलियुगासच लाग आहे ह्मणून ते विशेष आहे. सामान्य व विशेष वचनांची प्रसक्ति एकत्र आली असतां विशेषाने सामान्याचा बाध होतो, या नियमाप्रमाणे पराशराच्या वचनाने दघितम्याच्या वचनाचा बाधच झाला पाहिजे. दीर्घ. तम्याचे वचन कलियुगाविषयींच आहे, असे घेतले तरी