पान:विधवाविवाह.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हैं महाभारताच्या दुस-या एका भागांत सांगितले आहे. ते असे: ऋतावृतौ राजपत्रि स्त्रिया भी पतिव्रते। नातिवर्तव्य इत्येवं धर्म धर्मविदो विदुः ॥ शेषेष्वन्येषु कालेषु स्वातंत्र्यं स्त्री किलाहति । धर्ममेवं जनाः सन्तः पुराणं परिचक्षते ॥ . पंडु कुंतीस ह्मणतो;-" हे पतिव्रते राजकन्ये, धर्मज्ञ पुरुषांचे मत असे आहे की, प्रत्येक ऋतुकाळांत स्त्रीने पत्नीशिवाय अन्य पुरुषापाशी जाऊं नये; बाकांच्या काळांत स्त्री स्वेच्छेने अन्य पुरुषापाशी गेली तरी चिंता नाही, असा हा पुरातन धर्म ( संप्रदाय ) आहे असे साधुजन ह्मणतात" ह्मणजे आपणापासून उप्तन्न होणारी संतति पतीच्याच पोटची आहे अशी खात्री होण्याकारतां स्त्रियांनी गर्भ धार णाच्या दिवसांत मात्र पतीखेरीज अन्य पुरुषापाशी जाऊ नये अन्य दिवसांत त्यांनी पाहिजे तर दुसज्यापाशी जाऊन रा. हवे, हा संप्रदाय प्राचीन काळी धर्मिष्ठपुरुषांस मान्य होता हा त्रियांचा बहुत दिवसांपासून चालत आलेला स्वेच्छा. चार बंद करण्याकरितां दीर्घतमा याने याचा निषेध केला आहे. तेव्हां स्त्रियांनी अन्य पुरुषापाशी संबंध ठेवण्याचा हा निषेध अर्थात व्यभिचाराविषयी आहे, यथाशास्त्र पुनविवाह करण्याविषयीं तो निषेध नाही. ग्रंथसंदर्भावरूनही हेच दिसतेः + महाभारत आदिपर्व अध्याय १२२. * रजस्वला झाल्यापासून १६ दिवसपावतोंगर्भ धारणाचा ऋतु(काल। भारे त्या दिवसात.