पान:विधवाविवाह.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बांधतां येत नाही तसे एका बायकोस एकाच काली (एक जिवंत असल्यावेळीच दुसरा पति करून एकंदर ) नंतर तिला दुसरा पति करता येत नाही असा आशय नाही. ही कल्पना माझी केवळ स्वकपोल कल्पित आहे असे नाही. महाभारतावरील टीकाकार नीलकंठ याने वेदांतीलच एक वा क्य घेऊन त्यावर व्याख्या केली आहे त्या व्याख्येवरून व मूळ वाक्यावरून ही वरील अर्थच दृढ होतो. ते वाक्यः नकस्या बहवः सह पतयः ।* का स्त्रीस बहुत पति एककाली होत नाहीत." व्याख्या. हतियगपढ़हपतित्वनिषेधो विहितो न तु समयभेदन या वेदवाक्यांतील सहशब्दाने, स्त्रीस एकाच वेळेस पति असण्याचा निषेध केला आहे; परंतु निरनिरा. ळ्या वेळेस बहुत पति असण्याचा निषेध नाही." याप्रमाणे विधवांचा विवाह वेदास विरुद्ध आहे असे में शाच्या वादींचे मत आहे ते अगदी खोटे ठरले. वेदाचाच आशय आपल्या स्मतीमध्ये ऋषांनी आणिला आहे हे सर्व मान्य आहे. तेव्हां वेदाविरुद्ध अशा विवाहाचा विधि ते कधी करतेना आणि त्याचा संप्रदायही प्राचीन काळे कधी चालतांना हा विचार या वादींनी करावयाचा होता

  • हे वाक्य पराशरसंहितेच्या व्याख्येत माधवाचार्यानही घेतलें भाहे. +भादिपर्व अध्याय २९५.