पान:विधवाविवाह.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

णजे ते आचाराविषयी कोणी मानणार नाही. कारण, वेदव्यासाने असा सिद्धांत केला आहे की: श्रुतिस्मृतिपुराणानां विरोधो यत्र दृश्यते । तत्र श्रोतं प्रमाणंतु तयोद्वैधे स्मृतिर्वरा ॥ ज्या वेदवाक्याशी पराशरवचन विरुद्ध आहे असे ह्यणतात ते हे:यदेकास्मिन यूपे द्वे रशने परिव्ययात तस्मादेको द्वे जाये विदेत । यन्नैकां रशनां द्वयोपयोः परिव्ययात तस्मा का द्वौ पती विदेत॥ "एका यज्ञस्तंभाच्या भोवती दोन रशना बांधतां येतात तशा एका पुरुषास दोन बायका करतां येतात; परंत एक रशना दोन स्तंभांभोवती बांधतां येत नाही त्याप्रमाणे एका स्त्रीस दोन पति करता येत नाहीत." विधवाविवाह वेदविरुद्ध आहे, हे त्यांचे ह्मणणे और याच वचनाच्या आधारावर आहे. " एका स्त्रीस दोन पाते करता येत नाहीत " हे वाक्य आढळतांच एकदम विधवा विवाह वद विरुद्ध आहे या सिद्धांतावर आमच्या प्रतिपक्ष्यांनी उडी मारली. तथापि त्या वेदवाक्याचा वास्तविक आशय असा नव्हे. तर त्याचा आशय हा की, एका यज्ञस्तंभाच्या भोवती दोन रशना एककाली बांधतां येतात तशा एका मनुष्यास एककाली दोन स्त्रिया करता येतात; आणि एक रशना एकाचकाली दोन यज्ञस्तंभांभोवती + अर्थ १९व्या पृष्ठावर पाहा. * यज्ञातील नियमित जांची एक दोरी.