पान:विधवाविवाह.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिली आहे असे मानलेच पाहिजे; या कारणास्तवच "पती चा पत्ता लागेनासा झाला " इत्यादि अर्थाच्या वचनावरील माधवाचार्याच्या व्याख्येत घेतलेले वचन मनुसंहितेतील ह्मणूनच घेतले आहे. ते असें: मनुरपि, नष्टे मृते प्रव्रजिते लोबे च पतिते पतौ। पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥ यावरून असे निखालस सिद्ध होते की, विधवाविवाह मनच्या मतास विरुद्ध नसतां सर्वधा त्याच्या मतास अनुस नच आहे; आणि पराशराने वरील वाक्य शब्दशः व अक्षरशः मनूपासूनच घेतले असतां विधवाविवाह मनुस्मृती विरुद्ध आहे असे स्थापन करण्याची खटपट करणे अगदी निष्फल आहे. अध्याय.४ पराशराचे विधवाविवाहविधायकवचन वेदांस विरुद्ध नाही. स्त्रियांच्या पुनर्विवाहा विषयांची पराशराची आज्ञा वेदांच्या अभिप्रायास विरुद्ध आहे असे सिद्ध करण्याकरितां कांहीं प्रतिपक्ष्यांनी यत्न केला आहे. हे करण्यांत त्यांचा हेत असा आहे की, या देशांत वेद हे सर्वामध्ये श्रेष्ठ प्रमाण आहे. तेव्हां पराशराचे वचन त्यास विरुद्ध असलें -

  • याचा अर्थ ९ व्या पृष्ठावर पाहा.