पान:विधवाविवाह.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न प्रजापति जो मनु याने रचले. त्याचे एक लक्ष श्लोक असून अध्याय एक हजार होते. मनूने ते शास्त्र देवार्षि जो नारद यास दिले; आणि नारदाने त्याजपाशी याचें अध्ययन केले, आणि ते शास्त्र फार मोठे असल्यामुळे मनुध्यांस संपादन करण्यास कठिण ह्मणून त्याचा संक्षेप बारा हजार श्लोकांत करून ते भृगुवंशांतील सुमति यास दिले. सुमतीने नारदापाशी त्याचे अध्ययन केले, आणि मनुष्याची आयुष्य मर्यादा कमी झाल्यामुळे त्याच्या शक्तीचा हास होणार असे पाहून त्याने त्याचा संक्षेप चार हजार श्लोकांत केला. ते हे सुमतीने केलेले शास्त्र मनुष्य पढतात. आणि मूळचे लक्ष श्लोकात्मक शास्त्र देव आणि गंधर्व हे पढतात. त्याच्या आरंभीचा श्लोक हाः-'हे विश्व तमोमय होते. यांत काही इंद्रियगोचर नव्हते, नंतर चार तोंडांचा भगवान स्वयंभु ब्रह्मदेव प्रादुर्भूत झाला.' या आरंभीच्या श्लोकानंतर एका मागून एक विषयाची प्रकरणे क्रमशः लिहिली आहेत त्यांतील नववे प्रकरण व्यवहाराबद्दल आहे, त्याची रचना देवर्षि जो नारद त्याने याप्रमाणे केली आहे.". यावरून नारदाच्या स्मृति ह्या मनुस्मृतींचाच निष्कर्ष आहे, हे उघड आहे; कारण, नारदाने मनूच्या एक लाख स्मृतींचाच संक्षेप केला आहे. या मनुसंहितेच्या नारदकृत संक्षेपांत, 'पतीचा पत्ता लागेनासा झाला' इत्यादि पांच आपत्तींच्या प्रसंगी स्त्रियांचा पुनर्विवाह करण्याविषयी आज्ञा आहे, असे मागे एका ठिकाणी दर्शविले आहे. तर ही आज्ञा पराशरानेच दिली असे न मानतां मन ही