पान:विधवाविवाह.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माप्ति झाली आहे ;-ह्मणजे क्षेत्रज पुत्र उत्पन्न करण्याविषयोंच्या विधीस उपक्रम करून त्याच्या निषेवी उपसंहार झाला आहे, आणि मधल्या सर्व वचनांत त्याच विषयाचा संबंध आहे; त्यापक्षी हे सर्व प्रकरणच दुसऱ्याच्या बायकोच्या पोटी पुत्र उत्पन्न करावा किंवा न करावा याविषयींचे आहे. आवां विधवाविवाह मनूच्या मतास विरुद्ध आहे, असें ज्या वचनाच्या जोरावर आमचे प्रतिपक्षी भांडतात, ते वचन ह्या वरील प्रकरणांतच आहे. त्याविषयी माझें ह्मणणे असे आहे की, त्या वचनाच्या पूर्वाधांत नियोग शब्द आहे, आणि त्याचा अर्थ, क्षेत्रज पुत्राच्या उत्पत्तीचा विधि, असाच निः. संशय आहे, त्यापक्षी त्या वचनाच्या उत्तरार्धातील संशयि. वार्थक जो वेदन शब्द त्याचाही अर्थ, संदर्भवशात : त्रज पुत्र उत्पन्न करण्याकरितां दुसऱ्याच्या स्त्रीचा अंगीका. र करणे, असाच मानला पाहिजे. वेदन हा झाला धात पासन निघाला आहे, आणि विद् धातचा अर्थ अथवा अंगीकार करणे, असा आहे. तेव्हां वेदन शब्दा. चा अर्थ, स्त्रीच्या हस्ताचा अंगीकार करणे, मग तो विवाहांत असो अथवा क्षेत्रज पुत्राच्या उत्पत्तीकरितां असो. यास्तव वेदन शब्दाचा अर्थ, तो विवाह प्रकरणांत आढळल्यास वि. वाह, आणि क्षेत्रज पुत्राच्या प्रकरणांत आढळ यास क्षेत्रज पत्र उत्पन्न करण्याकरितां स्त्रीचा अंगीकार असा होतो, असें मा. नले पाहिजे. उदाहरणे ; न सगात्रां न समानप्रवरा भायां विदेता

  • विष्णुसंहिता, अध्याय २४ वा.