पान:विधवाविवाह.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्यस्मिन् हि नियुनानाधम्म हन्युः सनातनम् ॥ ९.६४. नोद्वाहि केषु मंत्रेषु नियोग: कोयं ते कचित् । न विवाह विधायुक्तं विधवावेदनं पुनः ॥ ९.६५ अयं द्विनौ विद्वद्भिः पशुधर्मो विगर्हितः । मनुष्याणामपि प्रोक्तो वेणे राज्य प्रशासति ॥ ९.६६. स महीमखिला भुंजन राजर्षिप्रवरः पुरा । वर्णानां संकरं चक्रे कामोपहतचेतनः ॥ ९.६७. ततः प्रभात यो मोहात् प्रमीतपतिका स्त्रियम् । नियोजयत्यपत्यार्थे तं विगर्हन्ति साधवः ॥ ९.६८. पतीच्या पोटी संतान नसल्यास यथाविधि नियुक्त (अधिकार दिलेली) अशा पत्नीने, अभीप्सित पुत्र आपल्या उदरीं पतीच्या बंधूपासून किंवा इतर सपिंड नातेवाइकापासन उत्पन्न करून घ्यावा." "विधवेस पुत्रोत्पत्ति करून देण्याविषयी नियुक्त ह्मणजे योजिलेल्या पुरुषानं आपल्या आंगास घृत लावून रात्री मौन धरून त्या विधीवेच्या उदरी एकच पुत्र उत्पन्न करावा. दुसरा करूं नये." " एकाच पुत्राच्या उत्पत्तीपासून नियोगाचा कायदेशीर हेतु शेवटास जाणार नाही, असे वाटून नियोगाच्या नियमांमध्ये निपुण अशा कितीएक ऋषोंनी विधवेच्या उदरीं दुसराही पुत्र उत्पन्न करण्याविषयी सांगितले आहे." " विधवेचा नियोग केल्याचा हेतु यथाविधि शेवटास गल्यानंतर त्या उभयतांनी (विधवेनें व उत्पादकानें ) पर. स्परांशी सून आणि सासरा यांप्रमाणे वागावें."