पान:विद्यार्थि धर्म.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


घरांतील कर्ती स्त्री आई आणि कर्ता पुरुष बाप अशी स्थिति अस- ल्यास ऐदी, आळशी आणि केवळ आपल्या पुरते पहाणारा विद्यार्थी ह्मणजे. आईबापांना एक मोठें संकटच होय. विद्यार्थी आपला सारा दिवस पुस्तकांत व आपल्या खोलींत बसून स्वस्थ आहे. इकडे आई- बाप मरमर मरत आहेत, उदंड खस्ता खात आहेत, आणि घरांतील प्रौढ विद्यार्थी आईबापांना कोणत्याहि प्रकारचें साह्य करीत नाहीं, तर त्याला महामूर्ख झटले पाहिजे. विद्यार्थी असें ह्मणतील कीं' काय हो आम्ही अभ्यास करून पुढे पैसे मिळवूं लागलों ह्मणजे मग आईबापांची ह्मणाल ती सेवा करूं. आतां अभ्यासाच्या वेळीं ही कटकट कशाला ?' यास उत्तर इतकेंच कीं अभ्यासाला व्यत्यय आणून अभ्यास बुडवून आईबापांना मदत करा, असें कोणी ह्मणत नाहीं, तर पुस्तकी अभ्यासाबरोबर घरांतला सर्व व्यवहारही अभ्यास दृष्टीने पहा व आईबापांना साह्य करा, असेंच कोणीही सांगेल. कांहीं प्रसंगी अभ्यास बुडवूनही आईबापांना विद्या- र्थ्यांनी मदत केली पाहिजे. अभ्यासापरी अभ्यास आणि कर्तव्यापरी कर्तव्य अशा दोन्ही गोष्टी या व्यवहारांत साधत असतात. विद्या- यीचा अभ्यास बुडतो आहे किंवा त्याचे भावी आयुष्याचें नुकसान होत आहे असें दिसल्यास आईबापच " तूं तुझा अभ्यास कर आमची बिलकुल काळजी करूं नकोस " असें सांगतील. तात्पर्य कर्तव्य व अभ्यास या दोन्ही दृष्टींनीं विद्यार्थ्यांनीं घरांतील व्यवहारांत आई- बापांना मदत केली पाहिजे.

 विद्यार्थ्याला सर्व प्रकारची मदत आणि व्यवहारिक शिक्षण बापापासूनच मिळते, बापाला ' प्रपंच भर घे शिरीं वचन आयके आवरी ' ( पंत ) असाच मुलगा पसंत असतो. मुलगा हाच बापाचा खरा प्रतिनिधि आहे. बापानें अंगिकृत केलेली सर्व कार्ये तडीस नेण्याची जबाबदारी मुलावरच असते. हाणून बापाच्या सर्व हालचालींचा, व्यापाचा, उद्योगाचा विद्यार्थ्यांने अभ्यास केला पाहिजे, आईच्या खालोखाल मनुष्यावर बापाचे उपकार झालेले असतात.