पान:विद्यार्थि धर्म.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दहावें. ]
शिष्टाचार व व्यवहार.

९३


नुकसान होतें, आणि ठेचा लागतां लागतां शहाणपण येण्यास वार्धक्याच्या द्वारांत त्यांना प्रवेश करावा लागतो.

 व्यवहार हा केल्यानेच येत असतो, एखाद्या मुलाला पाणी ओढण्याचा, चूल पेटविण्याचा, प्रसंग आला तर तो ह्मणेल कीं मला हैं येत नाहीं; कारण मी तें शिकलों नाहीं. पण अशा गोष्टी शिकण्या- करितां कांहीं दुसयांच्या घरीं नोकरी धरावयाची नसते, किंवा शाळेत पाठहि घ्यावयाचे नसतातात. पाण्यांत पडूनच जसें हळूहळू पोहतां येतें, तसाच सर्व प्रकारचा व्यवहार करता करतांच येत असतो.. विद्यार्थ्याच्या व्यवहाराला घरांतूनच प्रारंभ झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रथम आईचे प्रेम तिला अनेक प्रकारच्या व्यवहारांत साह्य करून जास्त संपादन केले पाहिजे. जास्त झणण्याचें कारण आईचें मुलावर निरतिशय प्रेम असतेच, पण तिला त्रास न देतां किंवा तिचें मन न दुखवितां वागण्यास शिकले पाहिजे. 'न मातुः परदैवतम् ' हैं वाक्य प्रौढ विद्यार्थी विसरतात; विशेषतः लग्न झाल्यावर विसरतात ! लहानपणी आईने केलेले उपकार विसरणे ह्मणजे मोठा कृतघ्नपणा आहे. शिवाजीमहाराज मोठे मातृभक्त होते. परवा नुक्तेच वारलेले ग्वाल्हेर संस्थानाधिपति अलिजाबहाद्दर माध- वराव शिंदे हेहि मातृभक्त होते. अलिकडच्या काळांतील हीं मातृ- भक्तीचीं ठळकठळक उदाहरणे आहेत. तात्पर्य विद्यार्थ्यांनी मातृभक्त व्हावे.

 आई गृहकृत्यांत असतां धाकट्या भावंडांना खेळविणें, स्वयंपाक करीत असतां बाहेरचीं बारीक सारिक कामे असतील तीं जबाबदा- रीनें पार पाडणें, बाजारहाट करणें, घरांत जनावर असल्यास त्याला वैरणकाडी घालणे, पाणी पाजणें, चार दोन घागरी पाणी ओढून देणे, भोजनाला बसण्यापूर्वीची पाटपाण्याची तयारी करणें, आपल्या व आपल्या भावडांच्या कपड्यालत्याच्या बाबतींत स्वतः काळजी घेणें, इत्यादि गोष्टी केल्यास आईचें प्रेम जास्त वाढत असतें.