पान:विद्यार्थि धर्म.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दहावें. ]
शिष्टाचार व व्यवहार

९५


हैं लक्ष्यांत ठेवून वडिलांशीं विद्यार्थ्यांनी विनयाने व नम्रतेने वागलो पाहिजे. आतां कांहीं बाप अगदीच गांवढळ असतात आणि निसर्ग धर्माशिवाय दुसरें कांहींच समजत नसते, हें खरें. अशा आईबापांच्या बाबतींत वरचें हाणणे खोटे ठरेल, हे उघडच आहे. परंतु ज्या भाग्यवान् विद्यार्थ्यांना घरांतील कर्त्या वडील पुरुषाचा सहवास मिळण्याची संधी आहे, ती त्यांनीं गमावूं नये, वडिलांबरोबर बाजारहाट करणें, दरसालचा घर खर्चाचा अंदाज घेणे, घरचा सर्व हिशेबढिशेव लिहिणें, शेतकी व साबकारी हे वडिलांचे धंदे असल्यास देण्याघेण्याचा, व व्याजबद्र्याचा व्यवहार समजावून घेणे कागदपत्र, खतें, कर्जरोखे पाहणें, शेताच्या लागणीची, जमीन मशागतीची, जमीनीच्या मगदुराची, माहिती करून घेणें, बापाचा सर्व पत्रव्यहार समजावून घेणे, अशी सर्व कामें विद्यार्थ्यांनीं अभ्यास या दृष्टीने केली पाहिजेत. वर सांगितलेल्या इतक्या व्यवहारांचे शिक्षण बुद्धीचा विकास होण्यास आणि बहुश्रुतपणा अंगी येण्यास कांहीं कमी आहे, असें नाहीं, विद्यार्थी जेव्हां सुटीत घरी येतात, त्यावेळीं त्यांनीं थोडाबहुत अभ्यास करून हे सर्व व्यवहार पाहिले पाहिजेत. व्यवहार विद्यार्थी पाहूं लागले, तर त्यांना आपल्या घरची वस्तुस्थिति समजेल. विद्यार्थी कालेजांत असले कीं, नाटके, न्हावी, परीट, चहा, सिगारेट, टेनीस, पाटर्चा आणि इतर चैनी यांमध्ये अती पैसा उधळतात. त्यांना स्वतःच्या स्थितीची आणि आईबापांच्या दग- दगीची कल्पना नसते. ते विचारे एक वेळ जेऊन, फाटकें नेसून, अंधारांत वसून, मुलांना पैसे पाठवीत असतात. शेकडा पंञ्चाणव पालकांचा पैसा अशाच तऱ्हेचा असतो. घरीं येऊन सर्व व्यवहार विद्यार्थ्यांनी पाहिले, तर त्यांच्या बेताल वर्तनास प्रतिबंध होईल, आणि त्यांचे कल्याण होईल.

 पुष्कळ व्यवहार असे आहेत कीं, ते प्रत्यक्ष केल्यानेंच येतात. मनीऑर्डर, तार, व्हीं, पी., रजिस्टर, कचेऱ्या, रेल्वे, बँका यांचे व्यवहार विद्यार्थ्यांनी केले पाहिजेत. हे सर्व व्यवहार चार दोन वेळां