पान:विद्यार्थि धर्म.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


वाचू नयेत, हा जरी नियम असला तरी अपवाद म्हणून उषःकाल, गड आला पण सिंह गेला, भी, ऐक्यांतच मौज, राजा छत्रसाल, रागिणी, अशा तऱ्हेच्या कादंबन्या विद्यार्थ्यांनीं मधून मधून वाचण्यास हरकत नाहीं. ह्रीं पुस्तकें कादंबऱ्या या दृष्टीने वाचावयाचीं नसून त्यांत कांहीं उद्बोधक, उत्तेजक व जीवन पोषक विचार आहेत, ह्मणूनच ती वाचावयाची आहेत; एवढे विद्यार्थ्यांनी लक्ष्यांत ठेवावे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पसंत केलेल्याच कादंबऱ्या केव्हां केव्हां वाचाव्या.

________
प्रकरण दहावें.


शिष्टाचार व व्यवहार.

 अलीकडे व्यावहारिक शिक्षणाचा अभाव सर्वत्र हग्गोचर होत आहे. सुशिक्षित ह्मणजे व्यवहारशून्य मनुष्य अशी लोकांची कल्पना झालेली आहे. याचे कारण इतकेंच की शिक्षणामध्यें व्यावहारिक शिक्षणाचा मुळींच प्रवेश नाहीं, आणि व्यावहारिक शिक्षण घेण्याची वृत्तीही उत्पन्न केली जात नाहीं. सुशिक्षित माणसाचा जगण्याचा धंदा हांणजे नोकरी. नोकरीला जर कशाची अपेक्षा असेल तर ती परीक्षा व सर्टिफिकटे यांचीच !! मग व्यवहाराकडे पहातो कोण ? व पहाण्याचे कारण तरी काय ? विद्यार्थी इंग्रजी शिकूं लागले की त्यांना व्यवहाराकडे तुच्छतेने पहाण्याची सवय लागते आणि जगांतल्या गोष्टी व्यवहाराकरतांच आहेत, हें ते विसरतात. विद्वानांचे व व्यवहाराचें पूर्वीहि सरळ नव्हतें. हल्ली तर फारच बिनसले आहे. नवलाची गोष्ट अशी की इंग्रजी शिकत असलेल्या मुलांना व्यवहारांतल्या गोष्टी करणें हाणजे एक तऱ्हेचा अपमान वाटतो. त्यामुळे विद्यार्थी प्रपंचांत पडले की त्यांचे अनेक प्रकारें