पान:विद्यार्थि धर्म.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नववे.]
नाटकें, सिनेमा व कादंबऱ्या.

९१


केव्हां तरी हाणजे वर्षांतून फक्त एकदां एकादे चांगले नाटक व एकादा सिनेमाचा खेळ विद्यार्थ्यांनी पहावा.

 नाटके व सिनेमा यांच्या वर्गात विद्यार्थ्यांच्या मनावर अनिष्ट संस्कार करण्याच्या कामांत कादंबन्याहि जाऊन बसतात. नाटके व सिनेमा हे पहाण्याचे विषय आहेत, पण कादंबऱ्या हा वाचनाचा विषय आहे. कादंबऱ्या या ललित वाङ्मयामध्ये मोडतात. अशि- क्षितांना वाचनाची अभिरुचि व गोडी लावावी, या दृष्टीने कादंबऱ्यांचा उपयोग चांगला होतो. विद्यार्थ्यांची मनोवृत्ति साक्षर माणसांपेक्षां अधिक उच्च प्रकारची असल्यामुळे कादंबन्यासारख्या वाङ्मयाचा पगडा जर विद्यार्थ्यांच्या मनांवर जास्त बसला, तर त्यांच्या हातून अभ्यास होत नाहीं. हल्लीं महाराष्ट्रांत ज्या कादंबऱ्या व जीं नाटकें प्रसिद्ध होत आहेत, तीं सर्व विद्यार्थिवर्गाच्या सुधारणेकरितां लिहिली नसल्यामुळे त्यांचा त्यांना कांहीं उपयोग नाहीं. विद्यार्थी गृहस्थाश्रमी झाले ह्मणजे मग त्यांनी भाषांपैकी ललित वाङ्मयाचा खुशाल संस्कृत, मराठी, इंग्रजी, या आस्वाद घ्यावा. विद्यार्थि- दर्शत नाटकें कादंबऱ्या सारख्या चुरचुरीत वाङ्मयवाचनाची एकदां गोडी लागली हाणजे त्यांना शास्त्रीय गहन विचारांचा कंटाळा येतो. हल्लींच्या शास्त्रीय जगांत जितके आधिभौतिक शास्त्रज्ञ निर्माण होतील, तितकें देशाचें कल्याण होणार आहे. कादंबऱ्या हाटल्या कीं, त्यांत शृंगाररस हा भरलेला असतोच. कादंबरीतले संविधानक बहुतेक प्रेममयच असतें. त्याचा परिणाम मनावर होतो. विद्यार्थ्यांनी फावल्यावेळीं कांहीं चांगलीं पुस्तकें वाचावीत. विशेषतः ऐतिहासिक कर्त्या श्रेष्ठपुरुषांची चरित्रे वाचल्यास त्यांत कादंबरीप्रमाणें काल्पनिक भाग नसल्यामुळें उपदेशाच्या दृष्टीने चांगला फायदा होतो. रामायण, भारत, भागवत, या धार्मिक व राष्ट्रिय ग्रंथांचीं भाषातरेंहि झालेली आहेत. सुदैवाने महाराष्ट्रांत बरेचसे चांगले वाङ्मय प्रसिद्ध झालें आहे व पुष्कळ चांगलें ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. फावल्यावेळीं . विद्यार्थ्यांनी हे ग्रंथ वाचून काढावेत, विद्यार्थ्यांनी कादंबऱ्या मुळींच