पान:विद्यार्थि धर्म.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


 हल्लीं शाळांच्या वार्षिकोत्सवामध्ये नाटके करण्याची चाल पडूं लागली आहे. नाटक हाटलें कीं त्यांत स्त्रीची भूमिका येतेच. शाळेचे नाटक चांगलें व्हावें ह्मणून शाळेतील शिक्षक मुलांना अभिनय शिकवूं लागतात. त्यांत स्त्रीची भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य "शिक्षक" असा पदर सावरावा, असा मुरका मारावा, असें वायका सारखें बोलावें ” अर्से जेव्हां शिकवूं लागतात, तेव्हां तो देखावा पाहून अंतःकरण उद्विग्न होतें. शाळेच्या वार्षिकोत्सवामध्यें नाटक कर्तव्यच असल्यास एकादा वीररस प्रधान अंक करून दाखवावा. ज्यांत स्त्रीची भूमिका नाहीं, बीभत्स व शृंगाररस हे नाहीत, असें प्रह- सन किंवा असा एकादाच अंक फारतर करावा. जे नाटक विद्या- त्यांनी पहावें, असें आईबाप व गुरु ( शिक्षक ) यांना वाटत असेल, तें नाटक विद्यार्थ्यांना स्वतः जाऊन पालकांनीं व शिक्षकांनीं दाखवाचे. तात्पर्य जे नाटक चांगलें असेल, जे विद्यार्थ्याकरितांच लिहिले असेल, तेवढेच वीसवर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पहावें, वीस- वर्षांवरच्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्वतःचें बरें वाईट, हित अनहित, काय आहे हें कळतें, ह्मणून या बाबतींत त्यांना जास्त कांहीं सांग- -ण्याचें प्रयोजन नाहीं.

 नाटकाप्रमाणें सिनेमाचेंही खूळ बोकाळत आहे. सिनेमामध्यें तर सर्व गोष्टी प्रत्यक्ष करून दाखविल्या जातात. बऱ्या वाईट " गोष्टींचे तेथे सप्रयोग शिक्षण मिळते. त्याचा परिणाम विपरीतच होतो. पाश्चात्य राष्ट्रांमध्यें या सुधारणा वाढत आहेत, पण त्याबरोबर त्यांचे नियमनही होत आहे. आमच्या इकडे या संस्थांकडे नियमन- दृष्टीनें कोणी पहात नाहीं. लोकांच्या करितां ज्या संस्था आहेत, त्या लोकांचा फायदा किंवा तोटा काय करीत आहेत, हे डोळ्यांत तेल घालून पहाण्याची व त्यांचा पिच्छा पुरविण्याची जी तिकडच्या लोकांना सवय आहे, ती इकडे नसल्यामुळे समाजाला चांगल्यापेक्षां वाईट वळणच येथें लाविलें जात आहे. विद्यार्थ्यांनी सिनेमाच्याही फाजील मोहांत न पडणें चांगलें. आप्तेष्टावरोवर, वडिलावरोवर,