पान:विद्यार्थि धर्म.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नववें. ]
नाटकें, सिनेमा व कादंबन्या.

८८


या वाङमयाची थोडी बहुत ओळख असणें इष्टच आहे. पण हल्लींच्या अभ्यासक्रमांत ती दृष्टी नाहीं, संस्कृत नाटकांची ज्यांना तरफदारी करावयाची असेल त्यांनी खुशाल करावी. त्यांतील विचार विद्यार्थिवर्गाला योग्य आहेत कीं नाहींत याची छाननी केली जात नाहीं. निस्पृहवृत्ति व समाजहिततत्परता यांचा जेव्हां लोप झाला, “ सुखंच मे शयनंच मे " ही जेव्हां इच्छा प्रादुर्भूत झाली, त्याच- वेळी आश्रयदात्याचे भाट बनून त्यांची मर्जी सुप्रसन्न ठेवण्याकरितां कोठें कविता कर, कोठें समस्या जुळीव, कोठें नाटक लिही; असा व्यवहार सुरू झाला. जिवंतपणाच्या दृष्टीने संस्कृत कवीपेक्षां मराठी कवींचें वाङ्मय हेंच जास्त जोरदार व स्फूर्तिकारक ठरेल. कारण या सर्व कवींच्या पुढे ( पेशवाईतील सोडून दिले तर ) एका प्रबळ संस्कृतीशी टक्कर देण्याचा उद्देश होता. पण हें विषयांतर येथेच पुरे.

 विद्यार्थ्यांनी नाटकें पहावीत कां न पहावीत या प्रश्नाचें रोकठोक उत्तर " विद्यार्थ्यांनी नाटके पाहूच नयेत" असें द्यावें लागेल. नाटक ही कला देशांत पाहिजे, यांत संशय नाहीं, परंतु सर्व दृष्टीनें हतबल, निःशक्त, परावलंबी झालेल्या देशांतील विद्यार्थ्यांनी-- राष्ट्रांतील तरुण पिढीनें - ब्रह्मचर्याचा -हास अनेक कारणांनी होत असतां, त्यांत नाटकें पाहून आणखी एका कारणाची भर घालावी असें कोणीहि ह्मणणार नाहीं, कांहीं शहाणेसुर्ते लोक शिक्षकांनी उपदेशकांनीं व वक्त्यांनी कांहीं दिवस नाटकांत काढले पाहिजेत; असें हाणतात. परंतु नाटकाच्या अभिनयावरच आमच्या देशांतले सगळे कर्तृत्व थांबले आहे काय ? उलट नाटकी देशभक्त, व नाटकी हरिदास, उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी देशभक्तीचें व ईशभक्तीचे महत्वही घालविलें आहे.

 विद्यार्थ्यांना विद्यार्जनाच्या कालामध्ये अगदी कोंडून ठेवावयाचें नसले तरी विद्यार्थ्यांचे लक्ष्य अभ्यासावरून न उडेल यासाठी थोडी कडक शिस्त पाहिजे. मनुस्मृतीत विद्यार्थ्यांनी —