पान:विद्यार्थि धर्म.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


घसा कोरडा पडूं लागला, वादनविद्येने हाताला घट्टे पडूं लागले की नाटकांत जाण्याची इच्छा होते. बी. ए., एम. ए. होऊन, चांगले गयी किंवा शास्त्री होऊन, नाटकांत जाऊन त्या कलेचा उद्धार करण्याची महत्वाकांक्षा जोपर्यंत कोणी धरीत नाहीं, तोपर्यंत नाटके ह्मणजे कोणचीहि विद्या पूर्ण न केलेल्या कांहीं लोकांचा पोटाचा धंदा आणि समाजाच्या मनोरंजनाचें एक साधन, इतकाच त्याचा अर्थ आहे. विद्यार्थिवर्गाच्या दृष्टीने नाटकांकडे पाहिले तर नाटके ही विद्याथ्र्यांच्या हिताकरितां आहेत, असें ह्मणणें साहसाचे होईल.

 नाटके ही विद्यार्थिवर्गालाच उद्देशून जेव्हां लिहिली असतील व नाटककारांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या गुणावगुणांचें चित्र जेव्हां रेखा- ढण्याचा असेल, तेव्हां तेवढीं नाटके विद्यार्थ्यांनीं अवश्य पहावीत, पूर्वीचीं संस्कृत नाटकें काय, किंवा हल्लींचीं प्राकृत नाटकं काय, समाजाच्या मनोरंजनाकरितांच लिहिलेलीं आहेत, मनारेजन हाच त्यांचा प्रधान हेतु आहे. यांत तिळप्राय संशय नाहीं.

 काव्याचा रसास्वाद पूर्णपणे चाखण्यास अधिकार यावा लागतो. प्रियपत्नि मरून विधुरावस्थेत राहण्याचा ज्यांच्यावर प्रसंग आला असेल त्यालाच उत्तररामचरित्रांतील रस समजेल; आणि मुलगी सासरी निघाली असतां बापाची जी मनोवृत्ति होते, तिचा ज्याला अनुभव असेल, त्यालाच शाकुंतल नाटक समजेल. विद्यार्थ्यांना वरील नाटकें जशी रसाच्या दृष्टीने उपयोगी नाहींत, तशीच उपदेशाच्या किंवा विषयाच्या दृष्टीनेही उपयोगी नाहींत. नाटक हाणजे ते नाटकच त्यांत सगळ्या रसांचा थोडा बहुत तरी परिपोष केलेला असतोच. संस्कृत नाटकें काय अथवा प्राकृत नाटके काय जिवंत विचाराच्या दृष्टीने त्यांत फार थोडा भाग असतो. वेद, उपनिषदें, स्मृति, रामायण, भारत, यांचा जो मनावर संस्कार होतो, तो या नाटकांचा होत नाहीं. हल्ली उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांत संस्कृत भाषेच्या ज्ञानाकरितां नाटके लावण्याची चाल आहे. नाटके हा एक वाङमय खंड आहे, या दृष्टीने विद्यार्थ्यांना