पान:विद्यार्थि धर्म.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नववे. ]
नाटकें, सिनेमा व कादंबऱ्या.

८६


मनोरंजनाबरोबर शिक्षण व डोळ्यांत अंजनहि घालतां येतें, असे हल्लीं वाटू लागले आहे. या प्रकरणांत विद्यार्थिधर्माच्या दृष्टीनें नाटकें, सिनेमा व कादंबन्या यांचा विचार करावयाचा आहे.

 विद्यार्थ्यांच्या कोमल मनोवृत्तीवर अनेक तऱ्हेचे संस्कार नित्य होत असतात. एकाद्या भव्य डोंगरावर जाऊन उत्कृष्ट देखावा पाहिला की, विद्यार्थ्यांची अंतःकरणें अगदी उद्दीपित होतात. एकादें सुरस व्याख्यान ऐकलें, कीर्तन ऐकले, की त्याचाहि परिणाम विद्यार्थ्या. वर होतो. तमाशांतील अश्लील व अचकट विचकट प्रकारांचेहि अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होतात. तसाच प्रकार नाटकांचाहि आहे. अगदी सुज्ञ किंवा अज्ञ मनुष्यांच्या मनावर नाटकांचा परिणाम कांहीं होत नाहीं. परंतु तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर नाटकांचा संस्कार इष्ट न होतां अनिष्टच होतो. नाटके हीं लोक- शिक्षणाकरितां आहेत, असें जरी हाटलें तरी मनोरंजन हाच त्यांचा प्रमुख हेतु आहे. शिक्षणाकरितां संस्था, व्याख्याने, पुराणे, प्रवचने असतांना त्यांचा सुद्धां जेथें कांही परिणाम होत नाहीं, झाला तरी थोडाच होतो; अशा स्थितीत मनोरंजनप्रधान नाटकांनी विद्यार्थाना शिक्षण मिळेल असें समजण्यांत बिलकुल अर्थ नाहीं. नाटकें पाहि- ल्यानें विद्यार्थी सुधारतात, असे ऐकिवात नाहीं. कीर्तने, पुराणे किंवा व्याख्यानें ऐकून क्षणभर उपरति झाल्याची उदाहरणे क्वचित् कचित् कानों पडतात. परंतु नाटकासंबंधानें तेंहि बोलावयास नको ! नाटकें पाहिल्यामुळे विद्यार्थी विघडतात. नाटकी भाषा, नाटकी पेहराव, नाटकी ऐट, नाटकी नखरे, करूं लागतात, असाच लोक- प्रवाद ऐकूं येतो. नाटकांमुळे गोयगामच्या पोरांचे लक्ष्य अभ्यासा- कडे लागत नाहीं. जरा चांगल्या आवाजाचीं व देखणी पोरें असली कीं, तीं आमच्या हातांतून लवकर निसटून जातात, अशी गवयांची तक्रार आहे. नाटकांत जाऊन कृत्रिम सौंदर्यावर दोनहातवारे केले, लुगडें नेसून दोन ताना मारिल्या की टाळी मिळते. शाळेच्या अभ्यासाचा कंटाळा आला, गायनाच्या मेहनतीनें