पान:विद्यार्थि धर्म.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्यार्थि-धर्म.
उत्तरार्ध.
प्रकरण नववें.
________
नाटकें, सिनेमा व कादंबऱ्या.

 अलीकडे नाटकें, सिनेमा, व कादंबन्या यांचा फारच सुळसुळाट झाला आहे. विचारी माणसेंहि नाटके, व सिनेमा यांपासून नीतिमत्ता विवडूं लागली आहे, असें ह्मणत आहेत. एकादा भावनाप्रधान वक्ता जेव्हां हिंदुस्थानच्या अवनतीचा विचार करूं लागतो, तेव्हां तो नाटके व सिनेमा यांवर खापर फोडतोच. पूर्वीच्या गांवठी नाटका- पेक्षां हल्लींची नाटकें पुष्कळच सदभिरुचीच्या दृष्टीनें सुधारली आहेत, असेही कोणी ह्मणतात. नाटकवाल्यांची नीतिमत्ता ही पूर्वीपेक्षां सुधारत आहे; कारण त्यांत सुशिक्षित मंडळी पडूं लागली आहेत, असेंहि सांगण्यांत येते. नाटकी माणसें ह्मणजे छिचोर, अनेक व्यसनांची आगरें, असा ग्रह पूर्वी बहुजन समाजाचा होता; नाटकाचा धंदा हणजे हलक्या, उडाणटप्पू, छाकट्या माणसांनीच करावा, असा एका काळी समज होता. तो जाऊन हल्लीं त्या धंद्याला प्रतिष्ठित- पणाचें स्वरूप येऊं लागलें आहे. फार काय पण नाटकें हीं समाजाला सुधारण्याकरितां आहेत, बहुजन प्रवृत्तीला एक प्रकारचें वळण देण्याचे काम नाटकामुळे करितां येर्ते, नाटकाच्या योगानें