पान:विद्यार्थि धर्म.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


नांतल्या आईबापांना आपल्या मुलांना कसें आवरावें हें समजत नाहीं, ह्मणून सरकाराने अवघ्या पांच वर्षांच्या कोकरांना डांबण्या- करितां हे शाळारूपी कोंडवाडेच निर्माण केले आहेत की काय कळत नाहीं !!! आधी हिंदुस्थानांतील पोरें अजागळ आहेत, त्यांत एकादे पांच वर्षांचें बाळसेदार गुटगुटित पोर जरा इकडे तिकडे उनाडूं लागलें कीं बाप हाणतो "थांब लेका, तुला शाळेत डांबतों " इतक्या लहानपणीं आईबापांनी मुलांना शाळेत घालणें हें त्या मुलाच्या व राष्ट्रांतील संपत्तीच्या दृष्टीनें हानिकारक नाहीं काय ? पण गृहशिक्षण देण्याची पात्रता फार थोड्यांना आहे हाणून हा परिपाठ पडत आहे. हिंदुस्थांतील शिक्षणपद्धतीत, शिक्षणाच्या 'धोरणांत व ध्येयांत इष्ट ती सुधारणा होईपर्यंत लहान पोरांच्या प्रार- व्धांत कोंडवाडा लिहिला असून तो त्यांची खच्ची करीत आहे, असें मोठ्या दुःखानें ह्मणावें लागतें. आईबापांना व पालकांना इतकेंच सांगावयाचें आहे की, कृपा करून शक्य तोवर मुलांना आठ वर्षा- पर्यंत शाळेत घालूं नये. " उगीच उनाडतात तर काय करावें ? असें कोणी विचारतील तर त्याला उत्तर इतकेंच कीं, तीं आठ वर्षा- पर्यंत जितकी जास्त उनाडतील तितकी जास्त शहाणीं होतील. -आठ वर्षापर्यंतच्या उनाडण्यानें मुलें कधींही बिघडणार नाहींत, ..अशी आह्मीं ग्वाही देतों. मुलें विघडावयाचें वय हैं पुढेच असतें. . त्यावेळी कोणीहि पालक लक्ष्य देत नाहींत, असा खरा व्यवहार आहे. . लहानपणी अत्यंत उनाड, अगदी अर्क, गांवावरून ओवाळून टाक- लेली मुलेच पुढे मोठी कर्तृत्ववान् होतात, असें अनुभवास आलें आहे. बाजीराव, परशुरामभाऊ, शिवाजी, क्लाइव्ह हे सगळे अत्यंत वाय व खोडकर मुलगे होते. लहानपणीं बुद्धीचा विकास व्रात्यप- णांतच व्हावयास पाहिजे ह्मणजे तरुणपणीं त्या बुद्धीला योग्य वळण लागल्यास ती प्रभावशाली होते. आठव्या वर्षी मुलाला शाळेला घातले तर अवघ्या दोन वर्षांत त्याचें प्राथमिक शिक्षण संपेल, आणि सतराव्या वर्षीच आपल्या मुलानें मॅट्रिक पास व्हावें असें