पान:विद्यार्थि धर्म.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिलें. ]
विद्यार्थि-दशेचें महत्व.


आहे; पण राष्ट्रकार्यास लागणारें धडाडीचें सामर्थ्य जर तरुण पिढीत नसेल तर कसा राष्ट्रोद्वार होणार ? राष्ट्रांतील पुढाऱ्यांचे तप व त्याग यांच्या प्रभावाने पुष्कळ तरुण राष्ट्र कार्यसन्मुख होते आहेत, हें सुचिन्ह आहे. तरुणांनीं विद्यार्थिदशेत कसे वागावें, विद्यार्थिधर्माचें अनुष्ठान कसकसे करून आपली योग्यता वाढवावी, सनातन-धर्म-प्रतिपादित इहपरसुख कसें संपादन करावें हैं या विद्यार्थिधर्मात सांगावयाचें आहे.


 सोळा वर्षांपासून तों पंचवीस वर्षांपर्यंतचे सर्व विद्यार्थी आमच्या या विषयाचे अधिकारी आहेत. सर्व हिंदु आणि हिंद्वेतर विद्यार्थिसुद्धां या विद्यार्थिधर्माप्रमाणें वागले तर त्यांचेही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीं. मुद्दा इतकाच कीं, सोळा ते पंचवीस पर्यंतचा सर्व विद्यार्थिवर्ग डोळ्यांपुढे ठेऊन त्याला अनुकूल अशाच विद्यार्थिधर्मातील विषयांचे विवेचन या पुस्तकांत केलें 'आहे. विद्यार्थी सोळा वर्षांचा होईपर्यंत त्याला बरें वाईट समज- ण्याची पात्रता नसते. अर्थात् तोपर्यंतची जबाबदारी पालक व शिक्षक यांवर पडते ह्मणून त्यांनीहि या पुस्तकांतील विषयाकडे अवश्य लक्ष्य द्यावें, अशी त्यांना विनंति आहे.


 " अष्टमे वर्षे ब्राह्मणमुपनयेत " हाणजे आठव्या वर्षी ब्राह्म- णाच्या मुलाला विद्येकरितां गुरूच्या स्वाधीन करावें असा दंडक प्राचीन काळी होता. ही उपनयनाची ह्मणजे गुरुगृहीं विद्यार्थ्यास ठेवण्याची मर्यादा क्षत्रिय वैश्यांच्या बाबतींत वाढविलेली आहे. हल्ली चातुर्वर्ण्य विस्कळित झाले असून निराळी परिस्थिति उत्पन्न झाली आहे, ह्मणून आह्मी सरसकट आठव्या वर्षी सर्व मुलांना शाळेत घालावें असें ह्मणतो. आठ वर्षापर्यंत मुलांचे वर्तन " कामचार- कामभक्ष—कामक्रीड" अणजे वाटेल तसे वागावें, वाटेल ते खावें आणि वाटेल पितर्क उनाडीव, असच पाहिजे हल्ली मुलांमुलींना पांचव्या वर्षापात साळीमध्ये डांबण्याची चाल आहे. मुलाला शाळेत कां घालावयाचे तर मुलगा झुरीयांडपणा कारितो हाणून! हिंदुस्था-