पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिलें. ]
विद्यार्थि-दशेचें महत्व


जें आईबापांस वाटतें तेंही साध्य होईल. आईबाप व पालक ही विनंति ऐकतील काय ?


 गुरुगृहीँ जाऊन बारा वर्षे अध्ययन करावें असा जो पूर्वीचा नियम त्यास हल्ली अपवाद नाहीं. बी. ए. होण्याला हल्लींही बारा- वर्षे घालावी लागतातच. ह्मणजे बारा ते पंचवीस हीं तेरा वर्षेच खऱ्याखुऱ्या विद्यार्थिदशेची असतात. आयुष्याची मर्यादा " शतायुर्वै पुरुषः " अशी धरून चालण्याचें प्रयोजनच उरलें नाहीं. तथापि जें कांहीं आयुष्य असेल त्यांतला हा पहिला भाग ह्मणजे आयुष्यरूपी इमारतीचा पाया जितका भक्कम असेल तितकी इमारत मजबूत होते आणि पुष्कळ दिवस टिकते. भुसभुशीत पायावर उभा- रलेली इमारत केव्हां ढांसळेल याचा नेम नसतो. व्यापारी भाषेत बोलावयाचे तर यावेळीं भांडवल जमा करावयाचें असतें. पंचवीस वर्षांनंतरच्या आयुष्यांत जे जे व्यापार किंवा जे जे व्यवहार कराव- याचे असतात, त्यांना लागणारे भांडवल विद्यार्थिदशेतच जमवा- वयाचें असतें. न जमविलें तर पुढे दिवाळखोर व्यापान्याप्रमाणें फटफजीती होते. विद्यार्थी पंचवीस वर्षांचा झाला ह्मणजे त्याचा अभ्यास संपला, त्याचें समावर्तन झाले, आणि तो नव्या जगांत आला असें हाटल्यास चालेल. नव्या जगांत येणाऱ्या नव्या माणसास जे धकाधकीचे मामले करावयाचे असतात, त्याकरितां अनेक प्रकारचे सद्गुण लागत असतात. विरुद्ध परिस्थितीशी झगडून जो आपले घोडे पुढे दामटतो आणि कार्य यशस्वी करून दाखवितो त्यासच कर्ता पुरुष ह्मणतात. उदंड खस्तिची कामें । मर्द मारून जातसे | नामर्द काय तें लंडी | सदा दुवीत लालची । असे श्रीसमर्थांनीं मर्द माणसाचें लक्षण केलें आहे. हा मर्दपणा विद्यार्थिदशेतच मिळवावयाचा असतो. काटकपणा, कणखरपणा, शौर्य, साहस, धाडस, करारीपणा, निश्चय, चिकाटी, दयाँ, परोप- कार, शांति अशा मानवी अंतःकरणांतील निरनिराळ्या वृत्तीचा परिपोष याच काळांत करावयाचा असतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक