पान:विद्यार्थि धर्म.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें.
व्यायाम व झोप.

८३


अशा मनुष्याला झोप तेव्हांच लागते. एक मजेचा अनुभव असा आहे कीं, रात्री दहा वाजतां निजतांना पहाटे लवकर उठण्याचा संकल्प करून व मनोदेवतेची तशी प्रार्थना करून निजलें ह्मणजे नेमके त्यावेळी झोप संपून आपोआप उठतां येतें. मानसशास्त्राच्या दृष्टीने हा अभ्यास विद्यार्थ्यांनीं अवश्य करण्यासारखा आहे. असो. पहाटें पांच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंतच्या चक्रांत विद्यार्थ्यांना अशा रितीने वागतां आलें व त्यांत त्यांना गोडी लागून त्यांची कांहीं वर्षे या दिनचर्येप्रमाणे गेलीं, ह्मणजे त्यांच्या जन्माचें कल्याण झालें, असें त्यांनी समजावें. जन्माचे कल्याण व सार्थक्य व्हावे, याचसाठीं शास्त्रकारांनी अनुभवानें दिनचर्येचे नियम सांगितले आहेत. त्यांच्या आधाराने गेल्या पांच प्रकरणांतील विषयांचे साकल्याने विवेचन केलें आहे. वास्तविक घरोघरच्या पालकांनी विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी समजून दिल्या पाहिजेत. गृहशिक्षणाच्या अभावीं ज्या गोष्टी पूर्वी सहजासहजी होत असत, त्या आतां विस्तृतपणे सांगण्याची जरूर पडूं लागली आहे. विद्यार्थ्यांनीं या सर्व गोष्टींचे नीट मनन करावें व त्याप्रमाणें वागावें.

 विद्यार्थिधर्माचा पूर्वार्ध येथे संपला. उत्तरार्धास प्रारंभ करण्या- पूर्वी एकदा मागील विषयांचे सिंहावलोकन करणें इष्ट आहे. पहिल्यानें विद्यार्थिदशेचें महत्व किती आहे, हें सांगितलें. दुसन्या प्रकरणांत आयुष्याच्या ध्येयाबद्दल विद्यार्थी कसे चाचपडत असतात, व ध्येय ठरविणें किती आवश्यक आहे, याचा विचार केला. ध्येय अथवा साध्य ठरल्यानंतर साधनांचा विचार पुढे येतो. वेदांतांत जसें साधनचतुष्टय पाहिजे, तसेंच विद्यार्थिदशेत कोणतें साधनचतुष्टय विद्यार्थ्यांनी संपादन करावें; याचें विवेचन तिसऱ्या प्रकरणांत केलें. कोणतीहि गोष्ट हळुहळू अभ्यासानें साध्य होतें, हाणून दररोज शरीरबल, मनोबल, बुद्धिबल तपोबल कसें संपादन करावें, व चांगल्या सवयी कशा अंगवळणी पाडाव्या, या हेतूनें नित्यक्रमांतील महत्वाच्या गोष्टी सांगण्यास चौथ्या प्रकरणापासून