पान:विद्यार्थि धर्म.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
विद्यार्थी - धर्म.

[ प्रकरण


दहा पंधरा मिनीटें धार्मिक ग्रंथांचे वाचन करावें. मनाचे श्लोक, गीता, केकावली यांतील कांहीं भाग वाचीत वाचीत झोपी जाणे फार चांगले. प्रत्येक विद्यार्थ्यांने शेजारच्या विद्यार्थ्यापासून आपले हां तरुण निदान दोन हात तरी लांब घालावें. दुसऱ्याचे हांतरुण पांघरूण आपण वापरू नये व आपलें दुसऱ्यास देऊ नये, कारण त्यामुळे स्वच्छता बिघडते.

उपानहौ च वासश्च धृतमन्यैर्न धारयेत् ।


 असें भगवान् मनु हाणतात. सतरा अठरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनी अगदी जवळ जवळ कधीहि निजूं नये. हें वय गद्धेपंचविशीचें असतें. तरुण विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्यविघातक अशा अनेक सवयी याचवेळीं जडत असतात. याबद्दल पालकांनीं व शिक्षकानीं फार दक्ष असलें पाहिजे, प्रौढ विद्यार्थ्यांनी आयुष्यनाशाच्या अशा सवयी कधीह लावून घेऊं नयेत. पुष्कळ विद्यार्थ्यांना अंगांत घालून निजण्याची सवय असते, ती एका दृष्टीने वरी आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव कमी होतो. पण अंगांत असल्यावर पांघरुणे फार घेऊं नयेत. तोंडावरून अगदीं गुरगुट्न पांघरुण घेऊन कधीं निजूं नये. त्यामुळे श्वासोच्छ्वासास स्वच्छ हवा मिळत नाहीं. फार जड पांघरुण केव्हांही वाईटच असतें. फार जड पांघरुणामुळे उष्णता अधिक कोंडली जाते. त्यामुळे स्वप्ने पडतात व ब्रह्मचर्य-हास होतो. निज- तांना स्वच्छ पंचा किंवा सैल लंगोट नेसून निजणे फार चांगले. त्यामुळे धोतरें मळत नाहींत आणि अकस्मात् आग, आपत्ति, चोरी, यांच्या निवारणार्थ जाण्याचा प्रसंग आला तर चटकन जाता येते. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्ष्यांत ठेवून विद्यार्थ्यांनीं रात्री दहा वाजतां सुखानें निजावे.

 विद्यार्थ्यांचे आरोग्य इतके चांगले पाहिजे कीं, भुईस पाठ लागली न लागली तोंच त्यांनीं घोरण्यास लागले पाहिजे. पहाटे पांच वाजल्यापासून विद्यार्थिधर्माप्रमाणे ज्याचे आचरण झाले असेल व ज्याचे मन सर्व कर्तव्ये बरोबर केल्यामुळे प्रसन्न असेल,