पान:विद्यार्थि धर्म.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें. ]
व्यायाम व झोप.

८१


रात्री थंड पाणी घेऊन लघुशंकेस जाऊन यावें. निजण्यापूर्वी चार दोन चुळा खुळखुळून भरून टाकाव्या, हाणजे तोंडाला घाण येत नाहीं. काड्याची पेटी व दिव्याची व्यवस्था वगैरे नीट करून हांतरुणावर बसावें. कित्येक विद्यार्थ्यांना उशाशीं दिवा ठेवून निजण्याची सवय असते. रात्री पेटलेला दिवा ठेवून कधींहि निजूं नये. ठेवावयाचाच असेल तर तो समईचा दिवा वारीक करून ठेवावा आणि हां तरुणावर बसून एकाग्रचित्ताने ईश्वरस्मरण करावें. प्रातःस्मरण, स्नान, संध्या, ( ईशस्तवन ) भोजनापूर्वीची शांति आणि सायंकाळची स्तोत्रे ह्या हिंदुमात्राला अवश्य असलेल्या धार्मिक गोष्टींत कांहीं अंतरलें कीं काय याचा विचार आधी करावा. नंतर ईश्वरापुढे सकाळपासून निजेपर्यंत झालेल्या सर्व गोष्टींचा झाडा द्यावा. ज्या चुका केल्या असतील किंवा झाल्या असतील, त्यांचेंहि निवेदन ईश्वराला करून संनेबद्दल त्याची करुणा भाकावी. ईश्वरापुढे सर्व गोष्टी मांडून परमेश्वरा ! मी असा असा आहे, मला चांगले वाईट कळते, पण चांगलें हातून होत नाहीं, तेव्हां मला सत्कर्म करावयाची बुद्धि दे; असें मागणें मागावें. दयाघनाच्या चरणीं मस्तक ठेवून मला सद्बुद्धि दे, माझ्या देशाचें व माझ्या समाजाचं कल्याण कर, अशी त्रिवार प्रार्थना करून झोपी जावें.

 विद्यार्थी एकटाच जेव्हां असतो तेव्हां लौकरच झोपीं जातो. पण चार दोन विद्यार्थी जेव्हां एकत्र असतात तेव्हां ते दिवा मालवून गप्पा गोष्टी करीत करीत झोपी जातात. त्या गप्पा केव्हां केव्हां बाराबारा वाजेपर्यंत हि चालतात. त्या गप्पांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेचे भानही नसतें, हा प्रकार सर्वस्वी टाळावा. शेजारी चार दोन विद्यार्थी असले तर विद्यार्थ्यांनी दिवा मालविल्या नंतर बिलकुल गप्पा मारूं नयेत. झोप येत नसेल तर दिवा ठेवून झोप येईपर्यंत तुकारामाचे अभंग, प्रासादिक पद्ये, हाणावीत दासबोधाचा एकादा समास वाचावा. झोप लागण्यापूर्वी निदान
११