पान:विद्यार्थि धर्म.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
विद्यार्थी - धर्म.

[ प्रकरण


त्रास झाल्यामुळे झोप मात्र लौकर येत नाहीं. रात्रीच्या गाढ झोपेचा सुखानुभव समाधिसुखाच्या बरोबरीचा आहे. कित्येक विद्यार्थी रात्रीं वारावर दोन तीन वाजेपर्यंत चहाचे पेल्यावर पेले ढोसून अभ्यास करितात. या आसुरी प्रकाराचा तत्र निषेध केला पाहिजे, कांहीं विद्यार्थी अभ्यासालाच नेमलेली नाटक कादंबऱ्याच पुस्तकें उत्तर रात्रीपर्यंत वाचीत असतात. हे सगळे प्रकार महामूर्खपणाचे आहेत. रात्रौ दहा वाजेपर्यंत थोडीशी अभ्यासाची चिंतनिका करून विद्यार्थ्यांनीं हांतरुण घालण्याच्या जागेचा स्वच्छ केर काढून हांतरुण पसरावें.हांतरुण फार बोजड नसावे. विद्यार्थ्यांचे हांतरुण अगदी सुट- सुटीत असावें. हांतरण्यास सतरंजी किंवा एक घोंगडी, पांघरण्यास रजई, धावळी, पासोडी, चादर असें ऋतुमानाप्रमाणें असावें. उशाला उशी किंवा कांहीं तरी असावें. हांतरुणांतील कपडे वर्षांतून चार वेळां तरी धुतलेच पाहिजेत. घोंगडी खुपत असेल तर धुतलेला स्वच्छ चुरचुरीत खादीचा पंचा हांतरुणावर पलंगपुसा- सारखा हांतरावा.खादीचा स्वच्छ पलंगपुस नेहमी वापरावा. पांघरूण हलकेसे असावें. अतीजड, गरम व जीव घुसमटून जाईल, असें पांघरूण असू नये. याप्रमाणें हांटरुण घालून विद्यार्थ्यांनी आपली रोजनिशी लिहावी. सकाळपासून निजेपर्यंतच्या गोष्टींचें सामान्य टांचण रोजनिशीत असावे. दिवसांतील किती वेळ व्यर्थ गेला, कोणत्या वाईट गोष्टी केल्या अगर झाल्या हें रोजनिशांत टिपावें. ऐक सदैवपणाचें लक्षण | रिकामा जाऊं नेदी क्षण || या समयक्ती प्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण कामी लागला किंवा नाहीं है। दररोज पहावें व तें रोजनिशांत लिहावें. रोजनिशींत चांगल्या केलेल्या गोष्टीही लिहाव्या; पण सुधारण्याच्या दृष्टीनें सदोदित चुका लिहाव्यात. अवगुण घालविण्याचा उद्योग दररोज करण्यास रोजनिशीची साक्ष चांगली उपयोगी पडेल, निजण्यापूर्वी लघुशंकेस जायें, लघुशंकेस पाणी घेऊन जाणें अनेक दृष्टीने हितावह आहे.