पान:विद्यार्थि धर्म.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें. ]
व्यायाम व झोप.

७९


संपत्ति, आरोग्य, भेटे " यांतील रहस्य हेंच आहे. विद्यार्थ्यांनी रात्रीं जागजागून अभ्यास करण्यापेक्षां पहाटे चार वाजतां उठून अभ्यास करणें फार चांगलें. दिवसभर एक क्षणहि न गमावतां नित्यक्रमां- तील सर्व गोष्टी एका मागून एक करीत राहिलें ह्मणजे रात्री केव्हां एकदा निजन असें होतें. सहाव्या सातव्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना रात्रीं अभ्यास करावा लागतो. कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी सुद्धां रात्री साडेनऊ अगर दहाच्या पुढे जागूं नये. वाटल्यास पहाटे चार वाजतां उठावे, पण रात्री लवकरच निजावें. रात्री भोजनानंतर तास दीडतास ह्मणजे फार फार तर साडेदहा वाजेपर्यंत अभ्यास करावा. अभ्यासाकरितां मेण- बत्तीचा व समईचा दिवा असणें फार उत्तम. पूर्वांची समईची चाल हल्लीं पार नाहींशी झाली, आहे हें जरी खरें आहे; तथापि डोळ्यांला व मेंदूला सुखदायक असा हा समईचा प्रकाश असतो. हल्लीं घरोघरीं राकेल तेलाचे जस्ती किंवा कांचेचे दिवे वापरण्यांत येत असतात. गरीब लोकांच्या घरीं जस्ती चिमण्याचे राकेलचे दिवे वापरण्याची चाल आहे. पुष्कळ गरीब विद्यार्थ्यांना या असल्या भस्मासुरापुढेच घसून अभ्यास करण्याचा प्रसंग येतो. भस्मासुराचा प्रताप असा आहे कीं, तो विद्यार्थ्यांचें नाक, डोळे, तोंड, व कपडे हे सर्व काळे करून टाकतो. तात्पर्य हा भस्मासुर सर्वथैव वर्ज करावा. कांचेच्या दिव्यापुढे उताणे पडून अभ्यास करण्याची चाल फार बोकाळली आहे. ती वाईट आहे. दिव्यापुढें अभ्यासास बसतांना प्रकाश तोंडावर साक्षात् न पडतां पुस्तकावरच पडेल अशी व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनीं पडून लोळून असा अभ्यास केंव्हांहि करूं नये, अभ्यास रात्रीं बसून, दिवसा उभे राहून किंवा इकडे तिकडे फिरत फिरत करावा. वर्गात झालेल्या अभ्यासाची रात्री थोडीबहुत विंतनिका करावी ह्मणजे झालें. बारीक, किचकट, अशा अक्षरांची, पुस्तकें विद्यार्थ्यांनी रात्रीं वाचू नयेत. रात्रीं केव्हांहि जास्त डोके - फोडीचा व तात्विक अभ्यास करू नये. कारण रात्री इतकी उर- स्फोड करून तो विपयहि पक्का होत नाही आणि डोक्यास जास्त