पान:विद्यार्थि धर्म.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


आहे. नमस्कार झाल्यानंतर सकाळी किंवा फिरून अगर . खेळून आल्यानंतर सायंकाळीं आसने करण्याचा परिपाठ ठेवावा. आसने पहिल्याने कठिण वाटतात, पण दररोज करीत गेल्याने दहापांच आसने सहजासहजी साध्य होतात. आसनामुळे शरीराला हलकेपणा व बांधेसूदपणा येतो.

 आसनामुळे अंग हलके होऊन चित्तास एक प्रकारचा आल्हाद वाटतो. व्यायामशास्त्राचा उहापोह करण्याचें हैं स्थळ नसल्यामुळे व्यायामाच्या महत्वाची कल्पना येण्यापुरतें येथे विवेचन केले आहे. सायंकाळचा व्यायाम झाल्यावर हातपाय धुऊन ईशस्तुति अगर संध्यावंदन करून स्तोत्रे हाणावत भीमरूपीस्तोत्र, रामरक्षा, कृष्णाष्टक, मुकुंदमाला, शिवमहिम्न, अशा तऱ्हेची बृहत् स्तोत्ररत्ना- करांतील कांहीं स्तोत्रे प्रसन्न मनानें नित्य ह्मणावीत. देवापुढे उदबत्ती लावून एकदोन आरत्याहिं हाणाव्या. आरत्या व स्तोत्रे या सामुदायिक प्रार्थना आहेत. स्तोत्रे, आरत्या झाल्यावर मग भोजनास बसावे. भोजनापूर्वी दुपारच्या प्रमाणे अन्नस्तुतीचे मंत्र हाणावेत. व्यायाम झाल्याबरोबर लगेच भोजनास बसूं नये. व्यायाम व भोजन यांमध्ये निदान अर्धा तास तरी गेलाच पाहिजे. रात्रीचें भोजन फारच बेतानें करावें. ब्रह्मचर्य -हासाला रात्रीच्या भोजनांतील बेतालपणा, उत्तेजकपणा, हे बरेच कारणीभूत होतात. विद्यार्थ्यांना येथे इतकेंच सांगावयाचें कीं गेल्या प्रकरणांत सांगितलेल्या भोजनविषयक नियमांचे उल्लंघन एकादे वेळीं दुपारच्या भोजनांत झाले तरी चालेल; परंतु रात्रीं नेहमी हितमित व पथ्यकारकच आहार केला पाहिजे. रात्रीच्या भोजनानंतर जरा दहा पंधरा मिनिटें इकडे तिकडे करून विद्यार्थ्यांनी पुढच्या उद्योगास लागावें.

 रात्रीचा अभ्यास व झोप- विद्यार्थ्यांनी भोजन झाल्यावर अर्ध्या तासानें खुशाल निजावें. चौथ्या व पांचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रात्री अभ्यास न करणेंच चांगले. रात्रीं लौकर निजावें आणि पहाटे लवकर उठावें, “ लवकर निजे व लवकर उठे त्यास ज्ञान,