पान:विद्यार्थि धर्म.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें. ]
व्यायाम व झोप.

७७


पोर्ती उचलून ठेवणें, बागेत अगर शेतांत काम करणें, माती उकरणे, भरणें, डोक्यावरून वाहणे, शेतांतील कुंदा खणणें, कापुस काठ्या उपटणें, जोंधळा कापणें, भोट हाणणें, भांगलणे, असली श्रमाचीं कामें विद्यार्थ्यांनी व्यायाम हाणून केव्हां केव्हां करावीत. असलीं कार्मे केल्याने नुसता पोषाखीपणाच जातो, असे नाहीं; तर पाहिजे तें व पाहिजे तसलें काम उच्चनीचपणाचा भाव न धरितां करण्याची संवय लागते. स्टेशनवर, प्रवासांत, बाजारांत हमाल न दिसला कीं कांहीं जणांची तारांबळ होते. याचें कारण त्यांना कामाच्या सवयी नसतात, हें होय. खेळ खेळल्यानें जसा कुठेपणा जाऊन सामाजिकपणा येतो, तसेंच निरनिराळी अंगमेहनतीचीं कामें केल्याने काटकपणा, सोशीकपणा, व पाहिजे तें काम पुढे होऊन करण्याची वृत्ति हे सगुण येतात.

 विद्यार्थ्यांनीं दररोज सायंकाळी चांगला घाम येईपर्यंत व्यायाम करावा असे वर सांगितले, त्याचा अर्थ अति व्यायाम करावा असा मात्र नव्हे. व्यायामाच्या बाबतींत विद्यार्थ्यांनी " अति व्यायाम करूं नये व व्यायामहीन असूं नये " हेंच तत्व लक्ष्यांत ठेवावें. अति व्यायामामुळे शारिरीक जडत्व येऊन बुद्धिमांद्यहि येतें. शिवाय श्वास, खोकला असलेहि रोग जडतात. व्यायामाची सवय विद्यार्थि- दशेत चांगली लागली तर गृहस्थाश्रमांतही ती सुटत नाहीं. कांहीं कांहीं माणसे हातारपणी सुद्धां व्यायाम करितात. शरीराला नित्य कांहीं काम, नित्य व्यायाम, असा खुराक दिला ह्मणजे तें बरेंच दिवसपर्यंत टिकतें व मनुष्य दीर्घायुषी होतो. असो. प्रसन्न मनानें अंगांत घाम येण्यासारखा व्यायाम झाल्यावर घरी येऊन हात, पाय, तोंड स्वच्छ धुवावें, घामाचे कपडे काढून ठेवावे. ज्यांना फिरावयास जाण्याशिवाय दुसरा कोणताहि व्यायाम सोसत नाहीं, त्यांनीं बाहेरून फिरून घरीं आल्यावर थोडी आसनांची कसरत करावी. आसनांचा व्यायाम हा घरांतल्या घरांत कोर्डेहि सुखाने करतां येतो. विद्यार्थ्यांनी सकाळीं नमस्कार घालावेत, असें एकदां मार्गे सांगितलेंच