पान:विद्यार्थि धर्म.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


ह्मणजेच त्यांपासून नीतिशिक्षण मिळतें. विद्यार्थ्यांनी चांगला व्यायाम व्हावा ह्मणून उघड्या हवेतच खेळले पाहिजे. पत्ते, गंजीफा, बुद्धिबळे, सोंगट्या असले बैठे खेळ सुट्टीच्या दिवशीं घरांतल्या घरांत खेळणें केव्हां तरी चांगले, व्यायामाच्या दृष्टीने त्यांचा काडीमात्र उपयोग नाहीं. विद्यार्थ्यांना या बैठ्या खेळाचें व्यसन लागले की, अत्यंत हानी होते आईबापांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्याचीं प्रवृत्ति असल्या वैट्या खेळाकडे न वळेल अशी दक्षता घेतली पाहिजे. सोंगट्या, गंजीफा, बुद्धिवळें हे खेळ ह्मातारीकोतारी माणसें एकसारखीं खेळत बसलेली पाहिली की विद्यार्थ्यांना अनुकरणेच्छा उत्पन्न होते. अशी वस्तुथिति आहे.

 खेळाप्रमाणेंच पोहण्याचा एक सुरेख व्यायाम आहे. मात्र हा व्यायाम दररोज सायंकाळीच करावयाचा, असें मात्र नव्हे. ज्या गांवाला चांगली नदी असून पोहण्याची सोय आहे, अशा नदी- कांठच्या विद्यार्थ्यांना दररोज सकाळीं स्नानाच्या वेळेस हा व्यायाम घेणे शक्य आहे. कांहीं कांहीं गांवांना पोहण्यासारख्या चांगल्या विहिरी असतात. तेथें विद्यार्थी खूप पोहत असतात. पोहण्याचा व्यायाम हा व्यायाम या दृष्टीनें केल्यास बाधत नाहीं; परंतु पोहणें बाजूस ठेवून उगाच पाण्यांत बराच वेळ नुसतें डुंबत राहिल्याने प्रकृति बिघडते. कोणताहि व्यायाम जसा तोंड बंद करून नाकाने श्वास सोडीत करावयाचा असतो, तसेंच पाहतांनाही तोंड शक्यतोवर बंद ठेवावे. दररोज पोहर्णे अशक्य असल्यास निदान दर रविवारी सकाळीं अगर दुपारी विद्यार्थ्यांनीं पोहण्यास जाण्यास हयगय करूं नये. आठवड्यांतून एक दिवस जी सुट्टी असते तिचा उपयोग पाहणें, दहा- पांच मैल लांब डोंगरावर फिरावयास जाणें, पळणे अशा व्यायामाकडे केल्यास मानसिक विश्रांति मिळून शारिरीक दृष्टयाहि फायदा होईल. व्यायाम चांगला व्हावा, व निरनिराळीं शारिरीक कष्टाचीं कामें करण्याची संवय लागावी हाणून सायंकाळी विद्यार्थ्यांनीं दोन तास अंगमेहतीचीं कामेही करावीत, घरांत दहावीस घागरी पाणी भरणें,