पान:विद्यार्थि धर्म.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें.
व्यायाम व झोप.

७५


किंवा जास्ती आजारी पडला व कां पडला ? त्याची उंची वाढली किंवा नाहीं ? छातीचा घेर कमी जास्त झाला काय ? विद्यार्थी आडवा किंवा नाहीं ? याची चौकशी सुजाण आईवापहि करीत नाहीत, ही अतिशय शोचनीय गोष्ट आहे. भुकेबंगाल आईबापांची गोष्ट सोडून दिली तरी सुखवस्तु हाणजे मुलांनीं लवकर मिळविले पाहिजे अशी ज्यांच्या घरची स्थिती नाहीं, असले पालक सुद्धां विद्यार्थ्यांच्या शारिरीक प्रगतीकडे दुर्लक्ष्य करतात. प्रौढ व सुबुद्ध विद्यार्थ्यांनीं तरी व्यायामाकडे दुर्लक्ष्य करूं नये. पुष्कळ विद्यार्थ्यांना काय करावयाचे आहे व्यायाम घेऊन, कोठें मारायाच्या आहेत कुस्त्या, कोठें मारायाच्या आहेत लढाया, नको ती उगीच कटकट असेच वाटत असतें. असलें आळशी, गुळाचे गणपति, आणि करंटे विद्यार्थी पुष्कळ पहावयाला मिळतील. राष्ट्रांतील तरुण पिढीच्या तोंडून असले अजागळपणाचे उद्गार निघावेत यासारखी दुःखद गोष्ट कोणती ? देशाला पारतंत्र्यांत डांबून ठेवणाऱ्या या सर्व मनोवृत्ति नाहींतशा करावयास पाहिजेत. मर्दपणा अंग येण्यास विद्यार्थ्यांनीं नित्य चांगला दरदरून घाम येईपर्यत सावकाश व्यायाम केला पाहिजे. हेंच त्यांना पुनःपुनः सांगावेसे वाटतें.

 व्यायामाकडे प्रवृत्ति होण्यास खेळ हे मोठें साधन आहे. वर लहान मुलांना खेळच चांगले असे हाटले, ते प्रौढविद्यार्थ्यां चांगलेच आहेत. खेळांमुळे व्यायाम तर होतोच, पण अनेक विद्यार्थ्यांच्या धक्काबुक्कीमुळे स्वभावांतही बदल होतो, एकलकोंडेपणा जाऊन सामाजिकपणा येतो आणि तुसडेपणा जाऊन मनमोकळेपणा येतो. विद्यार्थ्यांना खेळण्याचा नाद लागला ह्मणजे अनेक खेळगडी त्यांच्या भोवती जमतात. परस्परांत गप्पासमा चालून एकमेकांबद्दल आपलेपणा उत्पन्न होतो, नानाप्रकारचे खेळ हें शरीरस | मर्थ्याचें जसें साधन आहे तसेंच तें नीतिशिक्षणाचेंहि साधन आहे. आज्ञा- धारकपणा, सावधानपणा, धैर्य, धडाडी, व स्वाभिमान हे सद्गु खेळाच्या योगानें अंगवळणी पडतात. मात्र खेळ व्यवस्थित चालले