पान:विद्यार्थि धर्म.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


पांढरपेशा लोकांनी दररोज सायंकाळीं व सकाळी पांच चार मैल फिरावयास जाणें उत्तम आहे. परंतु विद्यार्थ्यांची शरीरें असल्या व्यायामाने वाढत नाहींत व तीं कणखरही होत नाहींत, सोळा आंगांतून चांगला घाम येईल ते पंचवीस वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनीं असा दणकी व्यायाम केला पाहिजे.व्यायाम स्वच्छ जागेत प्रसन्न मनानें व सावकाश करावा. तो अनेक वेळां करावा. कुस्ती, दांड- पट्टा, बोथाटी, लाठी, जोर, जोडी, मलखांब असले मर्दानी व्यायाम विद्यार्थ्यांनी करावेत. संध्याकाळी घोड्यावर बसून दहापांच मैल रपेट करणें किंवा तीनचार मैल पळून येणें फार चांगले. अशक्त, रोगी, आजारांतून नुकतेच उठलेले, अशा विद्याथ्यांनी फिरावयास जावें.

 पुष्कळ विद्यार्थ्याच्या डोक्यावर या पुस्तकी शिक्षणाचा बोजा इतका पडतो की, त्या विचाऱ्यांना व्यायाम करण्यास फुरसतच मिळत नाहीं. ते घरी सायंकाळीं आल्यावरसुद्धां दिवा लागेपर्यंत एका कोपऱ्यांत पुस्तक हातांत धरून त्याच्याकडे केविलवाण्यामुद्रेने पहात बसतात ! वास्तविक पाहिले तर त्यावेळी अभ्यास कांहीं होत नाहीं. सकाळपासून बुद्धीला ताण पडलेला असतो आणि त्यांतच हे ओझें पडलें ह्मणजे शारिरीक, मानसिक व बौद्धिक दौर्बल्य मात्र वाढते. स्वभावामध्यें एकलकोंडेपणा, कुठेपणा आणि तुसडेपणा हे दोष येतात. पुष्कळ विद्यार्थ्यांचे स्वभाव मोकळे, मनमिळाऊ व दिलदार असत नाहींत, त्याचा दोष पालक व शिक्षक यांवरच आहे. विद्यार्थ्यांनें परीक्षा द्याव्या आणि अभ्यास चांगला करावा, एवढेच काय तें त्याना माहीत असतें. मुलगा घरीं आला . कीं त्याच्या मागें पुनः अभ्यासाचें टुमणे लागतें. मुलगा घरीं येऊन पोचतो न पोचतो तोच शिकवणीचा मास्तर मुलापुढे दत्त ह्मणून उभा असतो. इंग्रजी किती अधिक आले, गणित किती जास्त येतें, मुलगा भूगोल किती शिकला, याचीच चौकशी सगळे पालक करीत असतात, परंतु गुदस्तांपेक्षां यंदा मुलगा किती वेळां कमी