पान:विद्यार्थि धर्म.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्यार्थी - धर्म.

[ प्रकरण


विद्वत्ता, चांगली तपश्चर्या व चांगली अक्कल मिळविलेली असली ह्मणजे पुढील आयुष्य शंभर वर्षांपर्यंतही सुखानें जातें.

पूर्व वयसि तत्कुर्यात् येन बृद्धः सुखं वसेत् ।
दिवसार्थेन तत्कुर्यात् येन रात्रौ सुखं स्वपेत् ॥

 असा जो विदुरनीतीमध्ये उपदेश केला आहे तो फार महत्वाचा आहे. प्रल्हाद आपल्या संवगड्यांना कौमारावस्थेमध्येच भागवत धर्माचे आचरण करा, श्री समर्थ रामदास स्वामीही तारुण्यकाळी आरण्य सेवन करा, असें जें ठासून ठासून सांगतात त्यांतील वर्मही हेंच आहे. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंतच काय पाहिजे तें हस्तगत करितां येतें. "विशीं विद्या व तिशीं धन ही ह्मण" दीर्घायुष्याचा अभाव होऊ लागल्यावरच पडलेली असली तथापि तिच्यामध्ये बराच अर्थ आहे हे विसरता कामा नये. हिंदुस्थानांतील लोकांचें आयुष्य हैं सरासरी पन्नास वर्षे धरलें तर हल्ली पहिली पंचवीस वर्षे विद्यार्थि- दर्शतच जातात, यांत संशय नाहीं. आयुष्यांतील ही पहिली पंचविशी ह्मणजे विद्यार्थिदशा, हिलाच पूर्वी ब्रह्मचर्याश्रम असें ह्मणत असत. हा पहिला आश्रम किंवा ऐन तारुण्याचा काल सर्वांत अत्यंत महत्वाचा आहे, हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे.


 वस्तूच्या अभावी वस्तूची किंमत कळते. तारुण्य गेल्यावर ' अरेरे व्यर्थ आयुष्य घालविलें !' असे उद्गार काढण्याचा प्रसंग नेहमी पुष्कळांवर येतो. पुढच्यास ठेच मागचा शाहणा " या न्यायाने कांहीं शहाणपणांत भर पडावी तर तसा प्रकार दिसत नाहीं. “ गतानुगतिको लोकः " हा अनुभव सगळीकडे येतो. हिंदुस्थानां- तील पालक आपली जबाबदारी ओळखीत नाहीत, घरामध्ये गृह- शिक्षण मिळत नाहीं, सर्व तरुण पिढी सरकारच्या हातांत, अशा स्थितीत हिंदुस्थानचा विद्यार्थिवर्ग सर्व दृष्टीने कसा संगत आहे सांगावयास नकोच. हिंदुस्थानच्या उद्धाराकरितां तरणेबांड जवान पुढे यावयास पाहिजेत, असें जो तो कंठशोष करून सांगत