पान:विद्यार्थि धर्म.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें. ]
व्यायाम व झोप.

७३


चकवावें हें शिकतां येतें. हुतुतूमुळें धडाडी हा गुण अंगीं येतो. खोच्या खेळामुळें चपलपणा येतों. प्रत्येक खेळाचे याप्रमाणें कांहीं कांहीं वैशिष्ट्य सांगतां येईल,हल्लीं सरकारी हायस्कुलांतून क्रिकेट व फुटबॉल- सारखे खर्चाचे खेळ खेळण्याकरितां शाळेच्या फीशिवाय कांहीं पैसे घेण्यांत येत असतात. हे परदेशी खेळ फार खर्चाचे आहेत, विद्यार्थ्यांनीं लक्ष्यांत ठेवून आपले देशी, विनूपैशाचे खेळ खेळण्यास तरी कसूर करूं नये. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शरीर वाढीला लागत असतें. या वयांत पद्धतशीर व व्यवस्थित व्यायाम होत गेला, तर शरिराची आडवी उभी वाढ उत्तम होते. हल्ली व्यायामशास्त्रावर पुष्कळ सोपपत्तिक, शास्त्रीय आणि साधार चर्चा चाललेली आढळते. प्रौढ विद्यार्थ्यांनीं व्यायामशास्त्रावरील पुस्तकें वाचून त्यांत सांगितलेल्या शास्त्रीय पद्धतीनें नित्य व्यायाम करी जावा. कोणताहि व्यायाम करीत असतांना तो आपणास किती पचतो आहे, याकडे लक्ष्य ठेवावें. पुष्कळ विद्यार्थी चार दिवस अति व्यायाम करून आजारी पडतात. कित्येक विद्यार्थी तर व्यायाम करावयास चांगला खुराक खावयास पाहिजे, अशा समजुतीनें व्यायाम मुळींच करीत नाहींत. व्यायाम हा खुराकाशिवाय होत नाहीं, ही समजूत अगदी खोटी जाहे. विद्यार्थी दररोज जें अन्न खातात त्या अन्नांतील सत्वावरच त्यांना व्यायाम करितां येईल. ज्यांना पहेलवानी करावयाची असेल, त्यांची गोष्ट सोडून दिली तर बाकीच्यांना दररोजचें अन्न हेंच चांगले पचविण्यास व्यायामाची किंवा शारिरीक काबाडकष्टाची जरूरी आहे. सोळा वर्षानंतर जोर, जोडी, मलखांब, कुस्ती, असले दणकी व्यायाम विद्याथ्र्यांनी केले पाहिजेत. पुष्कळ विद्यार्थी वयाच्या सोळा सतरा वर्षांपासून अशक्तपणामुळें किंवा मनाच्या दौर्बल्यामुळें फिरावयास जाण्याचाच व्यायाम करतात. फिरावयास जाण्याचा व्यायाम वयाच्या पसतीस वर्षानंतर केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यांना फार चांगला आहे. पांढऱ्यावर काळे करण्याचा ज्यांचा धंदा आहे, अशा कारकुनी व
१०