पान:विद्यार्थि धर्म.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठवें . ]
व्यायाम व झोंप.

७१


शास्त्र, धर्मशास्त्र, अशा विविध विषयांवर जें सारस्वत प्रसिद्ध होत असतें, तें विद्यार्थ्यांनी वाचावें, आजच्या जगांतल्या काय काय हालचाली आहेत हैं समजण्याचें वर्तमानपत्र एक मोठें साधन आहे. जगांतील निरनिराळ्या हालचाली, शोध व उलाढाली वर्तमानपत्रांत असतात. समाज केव्हांही जुन्या विचारांवर जगत नाहीं. त्याला नवनव विचारांची स्फूर्ति मिळावी लागते हाणून वेद शिकणाऱ्या, शास्त्र शिकणाऱ्या फार काय पण सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी भारदस्त वर्तमानपत्रांचें, मासिकांचे, आणि निवडक चांगल्या पुस्तकांचे वाचन 'ठेविले पाहिजे. इंग्रजी, मराठी, संस्कृत, हिंदी, अशा निरनिराळ्या भाषांमध्ये पुष्कळ वर्तमानपत्रे व मासिकेँ आहेत, त्यांतील कांहीं मासिके व वर्तमानपत्रे गुरुजनांच्या आणि आप्तांच्या सल्ल्याने वाचावीत. फुरसतीच्या वेळीं हिंदी वर्तमानपत्रे व मासिकेहि चाळावीत. हिंदी भाषा ही हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा होणार आहे. अर्थात् तिचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. विवेकानंद खंडमाला, रामतीर्थांचे ग्रंथ, महाभारताची भाषांतरें, टिळक, आगरकर, गोखले, रानडे, भांडार - कर यांचें ग्रंथ, साधुसंताचे ग्रंथ हे अभ्यास संभालून विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत. निवडक वाचनीय पुस्तकांची यादी पुढें दिली आहे. तिचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा.

_________
प्रकरण आठवें.
व्यायाम व झोप.

 गेल्या चार प्रकरणांपासून नित्यक्रमांतील गोष्टींचा विचार करीत करीत आपण व्यायामापर्यंत आलों. या प्रकरणांत व्यायाम व त्यामुळे येणारी झोप यांचा विचार करून पूर्वार्ध संपवूं आणि थोडेसे झोपी जाऊं.

 विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी आल्यावर थोडें इकडे तिकडे करून वर्तमानपत्रे व मासिके यांच्याशी मार्गे सांगितल्याप्रमाणे बोलून नंतर