पान:विद्यार्थि धर्म.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


त्यांचा विद्यार्थ्यांनी विचार करून अंगिकार करावा. विद्यालयांतील शिक्षण कार्यक्रम संपवून विद्यार्थ्यांनीं घरीं जावें. खाण्यापिण्याचें एकदां विवेचन केलें असल्यामुळे मधल्या सुटीत काय खावें, सायंकाळीं घरीं आल्यावर काय खावें, किती खावें, कोठें खावें, याचा स्वतंत्र विचार करण्याचें येथें कारण नाहीं.

 भारदस्त वर्तमानपत्रे, मासिके व चांगली पुस्तकें-विद्या- लयांतून घरीं गेल्यावर विद्यार्थ्यांनी भूक असेल तर कांहीं तरी थोडेसें खावें. थोडी विश्रांति घेऊन व्यायामाची वेळ होईपर्यंत कांहीं घरांतील कामकाज असल्यास तें करावे. वडील माणसांजवळ बसणें, भावंडांना खेळविणें हीं व्यवहारांतील कामें विद्यार्थ्यांनी • जातां येतां केली पाहिजेत. विद्यार्थ्यांना भावी कालांत हिंदुस्थानांतील उत्तम नागरिक हाणून जगावयाचें आहे. त्या दृष्टीने आजचे जग कसे आहे, काय आहे, याची खडान्खडा नसली तरी त्यांना ढोबळ माहिती पाहिजे. त्यासाठी त्यांनी भारदस्त वर्तमानपत्रे व मासिकें हीं मधून मधून तरी चाळली पाहिजेत. हल्लीं पुष्कळ गांवांत मोफत वाचनालये सुरू झालेली आहेत. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. वाचनालयें प्रायः सायंकाळीं पांच ते आठ पर्यंत उघडी असतात. अशा वाचनालयाचा वाचकवर्गही पुष्कळसा विद्यार्थ्यापैकीच असतो. पांच ते सहाचे दरम्यान विद्यार्थ्यांनीं केव्हां केव्हां वर्तमानपत्रे, मासिके चाळावीत. मासिकांतील एकादा महत्वाचा लेख केव्हां वाचावा, हें कांहीं सांगतां यावयाचे नाहीं. तथापि अभ्यासाच्या पुस्तकांचा कंटाळा आला हाणजे मग सकाळीं, दुपारी शाळेतल्या मधल्या सुट्टींत केव्हांही वर्तमानपत्रांचें, मासिकांचे व चांगल्या निवडक पुस्तकांचे वाचन ठेवण्यास हरकत नाहीं. विद्यार्थ्यांनी सगळींच वर्तमानपत्रे आणि मासिकें, वाचण्याचें बिलकुल कारण नाहीं. राजकीय निरनिराळ्या पक्षाचीं जीं मुखपत्रे असतील, त्यांतील एकदोन भारदस्त वर्तमानपत्रे, तसेंच वाङमय, साहित्य, कला, उद्योग, समाज-