पान:विद्यार्थि धर्म.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें. ]
भोजन, वर्तन व इतर वाचन.

६९


बुजणे चाललेलें असतें, गप्पामुळे वावदूकपणा वाढतो, उगाच वितंड- बाद करण्याची सवय लागते. ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्जन करून पुढे महत्कार्य करावयाचें आहे, त्यांनी सकाळीं अभ्यासाच्या वेळीं, दुपारीं वर्गामध्यें आणि अशाच शिष्ट प्रसंगी गप्पा मुळींच मारू नयेत. तसें केलें तरच विषयाकडे लक्ष्य लागतें. विद्यादेवीच्या उपासनेचें चित्तैकाग्र्य हैं एक मोठे साधन आहे. या साधनाच्या जोरावरच अर्जुन द्रोणाचार्यांनी घेतलेल्या धनुर्विद्येच्या परीक्षेत पास झाला, हे पूर्वी सांगितलेच आहे.

 याशिवाय विद्यार्थ्यांचे शाळेतील इतर विद्यार्थ्यांशीं वर्तन संग्राहक व मनमिळाऊ असें असावें. आपणास पुढें कार्य करावयाचें आहे, अनेक प्रकारचें साह्य करणारी माणसे पाहिजेत, आपले विद्यार्थीमित्रच पुढे मोठे होऊन आपणास मदत करतील अशा दूरवर विचाराने बरोबरच्या विद्यार्थ्याशी मैत्री, आपल्यापेक्षां हुषार व वरील वर्गातल्या विद्यार्थ्याबद्दल आदर आणि खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी प्रेमळपणा अशी वागणूक ठेविली पाहिजे. विद्यालयांमध्ये पुष्कळ विद्यार्थी असतात, त्यांतील पांचपन्नास तरी चांगले मित्र करून सोडिले पाहिजेत. मनुष्य जोडण्याचा प्रसंग केव्हांही घालवू नये. पुष्कळ विद्यार्थी आपल्या वाकापलीकडील विद्यार्थ्यांना ओळखीत नसतात. खोलीबाहेर जग नाहीं, असल्या एकलकोंडेपणाची ज्यांना संवय लागली असेल त्यांनी ती घालवावी आणि सामाजिकपणा येण्याकरितां मन मोकळे करून विद्यार्थ्यात मिसळावें, चार माणसे जमविण्याची विद्या विद्यालयांतच प्राप्त केली पाहिजे. कांहीं उनाड विद्यार्थ्यांना बुद्धिमान् व प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मत्सर करण्याची सवय असते. कांहीं विद्यार्थ्यांना परोत्कर्ष सहन होत नाहीं, सामा- न्यतः मानवी अंतःकरणांतले जे विकार प्रौढपणीं प्रगट होत अस- तात ते सूक्ष्म रूपानें विद्यार्थ्यांच्या ठिकाणीहि असतात; व हे असावयाचेच. पण पुढच्या आयुष्यांत जे गुण, ज्या सवयी, ज्या वृत्ति, ज्या मनोभावना आपले ध्येय गाठण्याकरितां उपयोगी पडतील