पान:विद्यार्थि धर्म.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


गुरुजनाबद्दल आदरहि पाहिजे. विद्या ही प्रेमानेच होते. प्रेमामुळेच आदर वाढतो; विद्यार्थ्यांनीं वर्गात पाठ चालला असतां किंवा कॉलेजांत लेक्चर चाललें असतां तें काळजीपूर्वक ऐकावें. एकाग्रचित्तानें विषय नीट समजून घेतला ह्मणजे घरी फार अभ्यास करावा लागत नाहीं आणि परीक्षेच्यावेळी तारांबळ उडत नाहीं.

 विद्यार्थ्यांना विद्येच्या मार्गात विघ्नं करणारे सात शत्रू आहेत; ते हाटले ह्मणजे:-

आलस्यं मदमोहौच चापलं गोष्टिरेव च ।
स्तब्धता स्वाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेवच॥

[महाभारत आळस, उद्धटपणा, दुश्चितपणा, गप्पेबाजी, घुम्मेपणा, स्वतःला सगळें येर्ते आहे असा अभिमान (अहंमन्यता) आणि दुराग्रह न सोडणं हे होते. या सात शत्रूंच्या तडाक्यांत विद्यार्थी सांपडला हाणजे त्याच्या विद्येचे मातेरें झालें ह्मणून समजावे. पुष्कळ विद्यार्थ्यांना चलचित्तता अथवा चित्तचांचल्यामुळे विषयच कळत नाहीं. पुष्कळांना विषय कळण्याचें सामर्थ्य असतें पण घुम्मेपणानें किंवा अहंमन्यतेनें वर्गात ते आपल्या शिक्षकांस आपले हृद्गतच मुळीं कळू देत नाहीत. कांहीं विद्यार्थी न समजतांच आपणांस समजलें हणून माना डोलवीत असतात. कित्येक विद्यार्थी तर वर्गांत विषयांतर करून कांहीं तरी प्रश्न विचार- तात व घंटा केव्हा होईल हे पहात बसतात. तसेच कांहीं स्वतः गप्पा मारतात व इतरांनाही गप्पांचें व्यसन लावितात. गप्पांचें व्यसन व दारूचे व्यसन यामध्ये मुळींच अंतर नाहीं. दारूबाज मनुष्य जसा, तसा विद्यार्थी त्या व्यसनांतून सुटणें मुष्कीलीचे असते. विद्यार्थ्यांना वेळी अवेळीं वाटेल त्या विषयावर वाटेल तशा गप्पा मारण्याची सवय लागली कीं त्यांचे विद्येकडे दुर्लक्ष्य होतें. पुष्कळ विद्यार्थ्याच्या गप्पा अविचाराच्या नसल्या तरी अपूर्ण विचाराच्या, अर्थात् " लहान तोंडी मोठा घास " या सदरांतीलच असतात. रात्रीबेरात्री, सकाळी, अभ्यासाच्या वेळी किंवा कीर्तन, व्याख्यान चाललें असतांना सुद्धां एका बाजूस अशा गप्पीबाज मंडळांचे कुज-