पान:विद्यार्थि धर्म.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें. ]
भोजन, वर्तन व इतर वाचन

६७


तो प्रश्न आहे. आह्मांस असें वाटतें कीं, वरील सर्व प्रसंगी विद्यार्थ्यांचे वर्तन अगदी बाणेदारपणाचे पाहिजे, देशभक्ताची उगाच निंदा केल्यास तेथल्या तेथे सडेतोडपणानें त्याचें खंडन केलें पाहिजे. देशकार्याचे मार्ग व मतें भिन्न असलीं, व तो यशस्वी न झाली ह्मणून एकादी व्यक्ति निंदेला पात्र होते असें नाहीं. आपल्या समाजावर, धर्मावर निराधार आक्षेप घेणाऱ्यांचे खंडण करून त्यांचीं तोडें बंद पाडलीच पाहिजेत. पण एवढे प्रसंग सोडून दिले तर बाकीच्यावेळी विद्यार्थ्यांचें वर्तन सभ्य, प्रेमळ व जिज्ञासूपणाचे पाहिजे. आईबाप जन्म देतात पण गुरु हा विद्या देऊन जन्माचें कल्याण करितो ह्मणून- मतवैचित्र्य असले तरी - गुरु, अध्यापक व शिक्षक ह्यांच्याशी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी या नात्यानेंच वागले पाहिजे. उध्दटपणा व हांजीखोरपणा हीं दोन टोकें सोडून विद्यार्थ्यांनीं मधली वृत्ति स्वीकारावी. गुरुजन हे आपले आप्त आहेत, त्यांना आपल्यापेक्षां अनुभव व विद्या अधिक आहे, हे ध्यानांत ठेवून विद्या- लयांत व बाहेरही विद्यार्थ्यांनीं आपलें कल्याण होईल अशी वर्तणूक गुरुजनांशी ठेवावी. विद्यार्थ्यांनी विद्यालयांत प्रत्येक तासास अगदी नेमकें हजर राहिलें पाहिजे. अनियमितपणा हा एक मोठाच दोष आहे. जो नेमका वागावयास लागतो त्याला जग मान देतें, असें समर्थ सांगतात. पुष्कळ विद्यार्थ्यांना नेमकें वागण्याची संवय नसल्यामुळे कांहीं वेळ बाकांवर उभे रहावें लागतें, किंवा अध्यापकांचे बोलणें सहन करून पूर्वी वर्गात नुकत्याच होऊन गेलेल्या अभ्यासास मुकावें लागतें. अमेरिकेत जेम्स गार्फील्ड हाणून एक प्रेसिडेंट होऊन गेला. तो लहानपणीं अगदीं गरीब असल्यामुळे शाळा झाडण्याचे व घंटा देण्याचें काम पत्करून तो शिकूं लागला. हैं काम त्याने इतके नियमितपणें बजावले की, त्या शाळेतील मुख्याध्यापकाने त्याची त्याबद्दल फारच प्रशंसा केली. बशीरपणा व नियमितपणा हे दोन गुण गार्फील्डच्या मोठेपणास बरेच कारणीभूत झाले, यांत शंका नाहीं. विद्यार्थ्यांच्या ठिकाणीं जसा वक्तशीरपणा पाहिजे तसाच भोर