पान:विद्यार्थि धर्म.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें. ]
भोजन, वर्तन व इतर वाचन.

६५


करीत नाहींत. विविविचि जेवण करून हातावर पाणी ओतून खरकटें गेलें कीं न गेलें हें न पाहून ते विचारे कचेरीकडे किंवा शाळेकडे पळत सुटतात !! यामुळे अन्न अंगीं लागत नाहीं, पचत नाहीं, व रोग मात्र वाढतात. हल्लींच्या अल्पायुष्यास अनेक कारणां- पैकीं हैं एक कारण होय यांत शंका नाहीं. विद्यार्थ्यांनी अगदी नेहमी मितभुक् असावें ह्मणजे अगदीं आजान्यासारखें पथ्यावर असावें, अर्से मात्र नव्हे. प्रसंगविशेष, लग्न, मुंज, उत्सव, सण, संमेलन आणि शाळेला सुट्टी हीं असलीं ह्मणजे त्यांनी यथेच्छ आहार करावा व खुशाल एक दोन तास झोपावें. पण नेहमींच्या वागण्यांत वरील सूचना लक्ष्यांत ठेविल्या पाहिजेत. भोजन झाल्यावर चांगले हात धुवून खुळखुळून चुळा भराव्या. हाताला ओशटपणा न राहील व दांतांत अन्नाचे कण न राहतील इतक्या सावधगिरीने आंचवावे. कपडे घालून दहा पांच मिनिटे विश्रांति घेऊन वाटेंत न गमतां थेट आपल्या विद्यालयाकडे जाऊन तेथील कार्यक्रमास हजर रहावें. विद्यार्थ्यांनी भोजनोत्तर तांबूल भक्षण करूं नये. सुपारी खाऊं नये. फारतर केव्हां तरी एकादी लवंग खावी. मग विड्या, सिगारेटस् ओढूं नये हें सांगावयास नकोच. विद्यार्थ्याचा पोषाख साधा, सुटसुटीत व स्वदेशी असावा. खादचे कपडे विद्यार्थ्यांनी वापरले तर गोरगरीबांना अन्न मिळेल व स्वदेशी वापरले तर देशांतील पैसा देशांत राहील. अंगांतील कपडे स्वच्छ व नीटनेटके असावेत गरीब विद्यार्थ्यांचे चांगले कपडे नसले तरी जे असतील ते स्वच्छ पाहिजेत. अंगांत एक सदरा अगर पैरण, वर कोट, डोक्यास टोपी अथवा रुमाल इतकाच पोषाख असावा. बूट, ओव्हरकोट, पायमोजे, गरम कपडे हे अजारी असतांना किंवा थंडी वान्यांत वापरावेत. सदोदित वापरण्याचे कारण नाहीं. हिंदुस्थानचें--विशेषतः महाराष्ट्राचे हवापाणी असे आहे कीं, तेथे जास्त कपड्याची जरूरच नाहीं. पुष्कळ विद्यार्थी पोषाकाच्या बाबतींत साहेबांचे अनुकरण करितात. पोषाखाचा सुटसुटीतपणा हा साहेबांपासून व्यावा, पण आपल्या हवापाण्याला, राहणीला, पेशाला