पान:विद्यार्थि धर्म.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


झोप चांगली न येतां स्वप्ने वगैरे पडून ब्रह्मचर्य -हास होतो. रात्रीं यथास्थित दहीभात किंवा ताकभात खूप बडविला तर वरचेवर लघुशंकेस जावें लागतें व झोंपेचें मातेरें होतें. कांदे लसूण घालून शिळा भात फोडणीचा करून किंवा कोणत्याही शिळ्या पदार्थाला जास्त खमंगाई आणून त्यावर यथेच्छ ताव मारला तर आळसमहाराजांची स्वारी त्याठिकाणी वास्तव्यास आलीच, असें ह्मणावयास हरकत नाहीं. अन्नदोषामुळे आळस व आळसामुळे मृत्यु अशी मृत्यूची परंपरा मनुस्मृतीमध्ये सांगितली आहे. शिळ्या अन्नानें बुद्धिमांद्य येतें, आळस वाढतो, इतकेंच नव्हे तर प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो. अतिशौच अगर शौचाला अवरोध हे रोग विद्या- र्थ्यांना हल्लीं ब्रह्मचारीदशेतच जडतात. याचें कारण चिवडा, भर्जी, शेव मिसळ असल्या पदार्थाचें व शिळ्या खमंग अन्नाचें अतिरिक्त व अनियमित सेवन हैं होय. भगवद्भक्ताला जसें परमेश्वराचें स्मरण असावें लागतें तसेंच ? विद्यार्थ्यांनाहि नेहमी शंभर वर्षे जगून महत्कार्य करावयाचें आहे, असें सतत स्मरण असले पाहिजे. ह्मणजे त्यांच्या हातून भोजनजन्य अधर्म घडणार नाहीं. सात्विक आहार सुप्रसन्न मनानें करावा. परंतु तो बरीक चांगला चावून केला पाहिजे. ईश्वराने चावण्यासाठीं दांत दिलेले आहेत. अन्नाचें चर्वण झाले ह्मणजे तें लाळमिश्रित अन्न हलके होऊन चांगले पचते. जनावरांना नंतर रवंथ करावयाची सवय असते. तशी माणसांची सोय असती तर पाहिजे तसें अन्न भरण्याला हरकत नव्हती. परंतु दुर्दैवी मनुष्याची ईश्वरानें तशी सोय केलेली नाहीं ! ह्मणून त्यांनी अन्न चांगले चावून चावून खाल्लें पाहिजे. घोडा जसें आपले अन्न पहिल्यानेंच बारिक चावून गिळतो, तसेंच विद्यार्थ्यांनीही करावें, विद्यार्थिवर्ग व कारकूनवर्ग यांची अकरा वाजतां जेवण करून जाण्याची नेहमी घाई असते. हे बिचारे जेवतांना कढत कढत अन्न कसेतरी गिळतात. नीट चावत नाहींत इतकेंच नव्हे तर जै कांहीं ताटांत पडलें असेल तें पोटांत ढकलण्याखेरीज ते कांहींच