पान:विद्यार्थि धर्म.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्यार्थि-धर्म.
प्रकरण पहिलें.
विद्यार्थि-दशेचें महत्व.

 तारुण्य ही एक जगांत अजय चीज आहे. सर्व ऋतूंत वसंत ऋतु आणि सप्त स्वरांत जसा पंचम आलाप आल्हादकारक असतो, तसा मानवी मनुष्यांतील तारुण्याचा भाग मोठा हर्षोत्पादक असतो. नवीन रक्त सळसळत आहे, तारुण्य मुसमुसत आहे, भावना व कल्पना यांनी अंतःकरण भरलेले आहे, शरीर आणि बुद्धि पाहिजे त्या धडाडीचे कार्यात पुढे पुढे सरसावत आहेत, तारुण्यां- तील उद्दाम आणि बेमुर्वत वृत्ति या जोरांत आहेत, काळजी, चिंता, फिकीर यांची छटा बिलकुल पडलेली नाहीं, शारीरिक दुर्बलत्वाची कल्पनाही नाहीं, अमुक अशक्य असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्य तच आयुष्यामध्ये एका दृष्टीनें रंग असतो, असें झटलें पाहिजे. कीर्तनांत जसे पूर्व आणि उत्तर- रंग असतात तसेच आयुष्यांतही दोन रंग असतात. पूर्व रंग चांगला रंगला कीं, आख्यानही रंगतें. पण पूर्व- रंग जर विस्कटला व रंगदेवता रुसून गेली तर. कर्तिनका- राने कितीही आख्यान चांगले लाविलें तरी रंग भरतां भरत नाहीं; असा अनुभव आहे. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याचा विद्यार्थिदशा हा पूर्व- रंग आहे. हा पूर्व-रंग चांगला साधला तरच उत्तर आयुष्यांत या माणसाला सुख प्राप्त होते. दिवसभर काम चांगले केलें हाणजे रात्रीं झोप चांगली येते. आठ महिने चांगले काबाडकष्ट केले ह्मणजे पावसाळ्यांत चांगले सुखानें जैवतां येतें; तसेंच पूर्ववयांत चांगली तयारी, चांगलें भांडवल, चांगली शक्ति, चांगली बुद्धि, चांगली