पान:विद्यार्थि धर्म.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें. ]
भोजन, वर्तन व इतर वाचन.

६३


पाहिजे ह्मणूनच प्रत्येक मनुष्यास जेवण्याचा अधिकार आहे. जेवण हें कांहीं आयुष्याचे ध्येय नाहीं, हें लक्ष्यांत न आल्यामुळे पुष्कळ विद्यार्थी खादाडपणामुळे बकायका वाटेल तें खातात, आणि अजीर्णाने वरचेवर आजारी पडून ब्रह्मचर्याचा -हास करून घेतात. विद्यार्थ्यांनी दुसरा एक विचार असा डोळ्यापुढे ठेवावा कीं, मरे- पर्यंत जेवावयाचेंच आहे. एक दोन दिवस जेवून पुढे जेवण अजिबात बंद करण्याचें आहे, असें असतें तर गोष्ट निराळी. दररोज जेवावयाचें हें आहेच. मग उगीच हूं हाणून जेवण करून शाळेत जाऊन एका कोपऱ्यांत मेजावर टेकून वामकुक्षि करण्याचा कां बरें प्रसंग आणावा ? प्रत्येक हायस्कूल व कॉलेजमध्ये बाकाला शोभा आणणाऱ्या बादशाही विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो. त्यांचें काम विद्यार्थिदशेतच सगळ्या चैनी करून घेण्याचें असतें, यथेच्छ आहारविहार केला ह्मणजे त्यांचे कर्तव्य संपते! ब्राह्मणसमाजांत आग्रहाने पोटाला तडस लागेपर्यंत जेवणाचा प्रघात आहे. तो अत्यंत अनिष्ट आहे. मनुस्मृतींत असल्या अतिभोजनाचा निषेध केला आहे.

अनारोग्यमनायुष्यमस्वर्ग्यचातिभोजनम् ।
अपुण्यं लोकविद्विष्टतस्मात्तत्परिवर्जयेत् ॥

 अतिभोजन हैं आरोग्यनाशक, आयुष्यनाशक, धर्मनाशक असें असून ते पापपोषक व लोकनिंदास्पद असल्यामुळे त्याचा विद्या- र्थ्यांनीं त्याग केला पाहिजे. जेवतांना पाणी वेताबेतानें प्यावें. घटाघटा पुष्कळ पाणी प्याल्याने क्षुधानाश व अपचन होतें. अन्नापेक्षा पाणी जास्त झाले तर सुस्ती येते. नळ फुगणें शौचाला झाडून होणें, असले रोग पाणी जास्त प्याल्यामुळेच होतात. ज्यांना पाणी ज्यास्त प्यावे लागते त्यांनी सकाळी उठल्याबरोबर उष:पान करावें हें फार चांगलें, दिवसा अतिभोजन झाले तर सुस्ती येऊन आळस वाढतो व अभ्यास होत नाहीं. रात्रीं अतिभोजन झाले तर